महाभारत आदिपर्व – 40 खंड Mahabharat In Marathi Pdf Free Download

महाभारत -Mahabharat In Marathi Pdf Free Download

हिंदू मान्यतेत ज्या कांहीं रचना सर्वमान्य आहेत त्यातील एक महाभारत आहे. हिंदूंच्या सगळ्या परंपरा, चालीरिती, संस्कार ह्यांची मुळं महाभारतात आहेत. चौकस हिंदू व्यक्तिला बर्‍याचवेळा अमुक प्रथा कां प्रचारात आली असा प्रश्र्न पडतो परंतु, त्याचे समाधानकारक उत्तर मात्र त्याला मिळत नाही.

चार जण चार कल्पना सांगतात व त्याचा गोंधळ उडतो. ते होऊ नये व त्या वहिवाटी, प्रथा ह्यांचे मूळ कोठे आहे ते लक्षात वावे ह्यासाठी हा प्रयत्न आहे, हा अतुवाद वाचला कीं, त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळतील अशी लेखक अपेक्षा करतात . म्हणून, त्यांनी महाभारत ह्या महाकाव्याचा मराठीत अनुवाद करण्याचे ठरवले. आता पर्यंत महाभारतावर बरेच लिहीले गेले आहे व ह्यापुढेसुद्धा पुष्कळ लिहीले जाईल पण महाभारत, जसें आहे तसें, वाचकांना मिळणे आवश्यक आहेवते ह्या भाषांतराने लेखक वाचकांना देत आहे.

महाभारत हे एक महाकाव्य आहे. असें म्हणतात, हा सर्वात मोठा ग्रंथ आहे. मात्र अनुवाद करतांना ते गद्यात केले आहे कारण, त्यांना कवितेचे अंग नाही. महाभारताच्या उपलब्ध प्रतिंत कांहीं भेद आढळतात. त्यासाठी सगळे भेद भाषांतरात घेतले आहेत म्हणजे, कांहीं राहून जावू नये.

लेखक म्हणतात वाचक साधे मराठी आहेत ज्यांचे ज्ञान मोजके आहे असें गृहीत धरून अतुवादाची भाषा बाळबोध मराठी –Mahabharat In Marathi Pdf Free Download ठेवली आहे, त्यामुळें कोणालाही ते सहजपणे वाचता येईल व समजेल.

कांहीं लेखक अशा ग्रंथाचे अनुवाद करतांना मुद्दाम प्राचीन भाषा वापरतात परंतु लेखकांच्या अनुभव असा आहे किं, बहुतेक वाचकांना ते वाचण्यास त्रास होतो. म्ह्णून भाषा आपली नेहमीचीच ओघवती ठेवली आहे.

महाभारताचे अठरा पर्व आहेत व त्या आधीचा असा आदिपर्व म्हणून एक जोडला आहे. आदिपर्वामुळे महाभारतातील मुख्य कथाभागाचा पूर्वतिहास वाचकांना समजेल. आदिपर्वात हिंदूंच्या अनेक पुराणांच्या मुळसुत्राची कल्पना येते. म्ह्णून तो फार महत्वाचा आहे.   मात्र अनुवाद करण्याच्या सोयीसाठी संपूर्ण महाभारत ४० खंडांत विभागून दिले आहे. त्यामुळें हंटरनेटवर चढवतांना व उतरवतांना सोपे जाईल अशी अपेक्षा आहे. त्यात मूळ आदिपर्वाचे पांच खंड केले आहेत, त्यातील हा पहिला खंड आपण आता वाचणार अहात.

See also  भगवद्‌गीता -Bhagavad Gita In Marathi -ज्ञान व कर्म यांचा भक्तिशी काय संबंध आहे

महाभारत कधी लिहीले गेले असा प्रश्र्न नेहमी ते वाचणाऱयाच्या मनात डोकावतो म्हणून त्याबद्दल थोडे लिहीत आहे. महावीर व गौतम बुद्ध आपल्याला माहीत आहेत, साधारणपणे इसवीसन पूर्व ५५० वर्षे ते दोघे महानुभाव होऊन गेले.

जर महाभारताची रचना त्याआधीची असती तर त्याचा उल्लेख त्या काळातील जैन व बुद्ध साहित्यात निश्र्ितच आला असता. बुद्धाला सांख्यमुनी असें संबोधतात. कारण, त्याचे तत्त्वज्ञान सांख्य विचारावर आधारीत आहे. व्यासांची भगवत गीता वेदांताचे तत्त्वज्ञान मांडते जे तुलनेने अर्वाचीन आहे व सांख्य विचार हा हिंदू तत्त्वज्ञानातील पहिला

म्हृणजे, सर्वात जास्त जुना समजला जातो. जर ते बुद्धाच्या आधीचे असते तर निश्च्चितच त्याचा प्रभाव बुद्धाच्या विचारांवर झालेला दिसला असता.

विशेष करून हे दोघे राजघराण्याचे होते म्हृणजे त्यांचे शिक्षण त्या काळातील सर्वोत्तम असणारच मग त्याच्या अभ्यासात गीता, कृष्ण हे आले असते.

विशेषकरून जर ते दोघे धर्मावर काम करत होते तर हे अपेक्षित आहे. परंतु, प्रत्यक्ष असें दिसते किं, त्या दोघाच्याही तत्कालिन साहित्यात तो उल्लेख आढळत नाही. ह्याचा अर्थ महाभारत त्यानंतरच्या काळात रचले गेले असावे.दुसरा अंदाज असा कीं, वेदांत तत्त्वज्ञान लिह्ीणारे व्यास व महाभारतका व्यास एकच व्यक्ति होती असें साधार मानले जात आहे. वेदांताचा सार महाभारतातील गीतेत आहे. वेदांत तत्त्वज्ञानाचा उगम त्याच सुमारास झाला हे सर्वमान्य आहे.

महाभारत लिहीणारे व्यास सांगतात, वेदांचा विसर पडत चालला आहे तरी ते ज्ञान सोप्या भाषेत सामान्यानां समजावे म्हणून कथारुपातून ते उपलब्ध व्हावे ह्यासाठी त्यांनी महाभारत ही काल्पनिक रचना केली आहे. असें सर्व पहाता आपण अंदाज करू शकतो किं, महाभारत इसवीसन पूर्व ४००च्या सुमारास म्हणजे, अशोक सम्राटाच्या आधी लिहीले गेले असावे.

महाभारतात स्वतः व्यास एक पात्र अशी भूमिका करतांना दिसते. त्याप्रमाणे कृष्ण म्हणून जे पात्र आहे त्याचे सगळे कर्तव्य पहाता व्यास ज्यांचे खरे नांव कृष्ण द्वैपायन आहे, तेंच करीत आहेत असे वाटते. म्हृणजे महाभारतकार व्यास त्यांच्या रचनेत दोन भूमिका करतांत असें म्हणावे लागेल. त्यामुळें असे समजण्यास ह्रकत नसावी कीं, महाभारत त्यांच्या कल्पनांचाच एक भाग आहे.

See also  HSN कोड म्हणजे काय ? HSN code information Marathi - 6 अंकीकोड - 5 कोटीपेक्षा जास्त व्यावसायिक उलढाल

माझ्या मते, अशा चर्चेत वेळ व्यर्थ न घालवतां हिंदूंनी महाभारतातील कथांतून काय सांगावयाचे आहे ते पहावे.

खाली महाभारत मराठी ग्रंथ ची लिंक दिली असून तिथून –Mahabharat In Marathi Pdf Free Download करावे-तसेच एकूण ४० पुस्तकात संपूर्ण महाभारत असून, आपण eshitya साईट वरून महाभारत pdf downlaod करू शकतात

महाभारत मराठी अनुवाद:श्री .अशोक कोठारे-ashokkothare@gmail.com –

ई- साहित्य प्रतिष्ठान कडून पूर्व संमतीने  हा लेख ह्या ब्लॉग वर प्रकाशित.

पुस्तकांची पर्वणी अश्या  esahity ह्या संकेतस्थळा भेट देवून मराठीभाषेला समृद्धा करण्यात आणि वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यात सर्वांनी आपला वाटा उचलावा.


Download-Mahabharat In Marathi Pdf Free Download- खंड दूसरा

वरील लिंक वर फक्त महाभरत खंड दूसरा असून  संपूर्ण 40 खंड डाउनलोड करता खलील लिंक वर विजिट द्यावी


Mahabharat In Marathi Pdf Free Download
Mahabharat In Marathi Pdf Free Download


Download-Mahabharat In Marathi Pdf Free Download

2 thoughts on “महाभारत आदिपर्व – 40 खंड Mahabharat In Marathi Pdf Free Download”

Comments are closed.