IELTS परीक्षेची माहिती – IELTS Marathi Information

IELTS Marathi Information

IELTS चा फुल फॉर्म इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टम असा आहे.

IELTS ही एक इंग्रजी भाषेतील परीक्षा आहे अश्यासाठी ज्यांना की इंग्लिश मुख्य भाषा असणाऱ्या देशात शिकायला जायचे आहे किंवा नोकरी करता जायचे आहे,त्याच्यासाठी ही परीक्षा घेतली जाते.युनायटेड किंगडम,न्यूजलंड ,ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि अमेरिका ह्या देशातील कॉलेजमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचे असेल तर ही परीक्षा देणे गरजेचे आहे.

IELTS परीक्षा ही लिहणे, वाचणे,ऐकणे,बोलणे ,इत्यादी या चार गोष्टींचे विश्लेषण, आकलन  करण्यासाठी घेतली जाते. परीक्षा ही IDP एज्युकेशन ऑस्ट्रेलिया, कॅम्ब्रिज इंग्लिश लॅंग्वेज असेंटमेंट आणि ब्रिटिश कोन्सिल यांच्याद्वारे घेतली जाते. परीक्षेचा उद्देशा हा की आपण शिक्षण घेवू पाहत असलेल्या भाषेच आपल्याला किती ज्ञान , सखोल माहिती आहे.

परीक्षेचे चे प्रकार –

या परीक्षेचे मुख्यतः दोन प्रकार पडतात.

  • पहिला म्हणजे जनरल ट्रेनिंग
  • दुसरा अकॅडेमिक.

दोन्ही प्रकारामध्ये बोलणे आणि ऐकणे हे मुद्दे सारखे असतात,परंतु वाचणे आणि लिहिणे हे मुद्दे दोन्ही प्रकारांमधील परीक्षेमध्ये वेगवेगळे असतात.दोन्ही प्रकारच्या परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जातात.

IELTS Exam  सिलेबस आणि परीक्षा पॅटर्न –

  • ज्यांना चांगली मार्क्स पाडायची आहेत त्यांच्यासाठी ह्या परीक्षेचा चा पूर्ण अभ्यासक्रम माहिती असणे गरजेचे आहे.
  • या परीक्षेत चार मुख्य मुद्दे असतात.लिहिणे,वाचणे,ऐकणे आणि बोलणे.
  • चारी मुद्यांमधील आपल्याला मिळालेल्या गुणांची बेरीज करून एकूण गुण काढले जातात.
  • ही 2 तास 45 मिनिटांची असते

IELTS चा फुल फॉर्म काय आहे ?- IELTS  Marathi Information

IELTS – International English Language testing system-ही एक आतंरराष्ट्रीय दर्जाची परीक्षा आहे,जे की आपली इंग्लिश भाषेवरती कमांड किती आहे याचे आकलन करते. ही इंग्लिश भाषेसाठी घेतली जाणारी जगातील सर्वोच परीक्षा आहे.दुसऱ्या नंबरला टोफेल परीक्षा येते.

See also  डाँ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्यावर निबंध - Sarvepalli Radhakrishnan Essay In Marathi

IELTS Exam  च्या दोन आवृत्ती आहेत.

  • अकॅडेमिक आवृत्ती -अकॅडेमिक आवृत्ती ही त्यां विद्यार्थ्यांसाठी तयार केली आहे ज्यांना इंग्लिश प्रमुख भाषा असणाऱ्या देशात अभ्यास व प्रशिक्षण साठी जायचे आहे.ज्यांना इंग्लिश प्रमुख असणाऱ्या देशात जॉबला जायचे आहे,त्यांच्यासाठी ही आवृत्ती आहे.
  • जनरल ट्रेनिंग आवृत्ती – ही आवृत्ती त्यांच्यासाठी आहे ज्यांना कमी इंग्लिश प्रमुख असणाऱ्या देशात प्रशिक्षणासाठी कमी ,मुख्यत: राहण्यासाठी जायचे आहे.

परीक्षेची रचना –

ही परीक्षा मुख्यतः चार भागामध्ये विभागली आहे आणि ह्या परीक्षेचा एकूण कालावधी साधारण  3 तासाच्या असतो

  • ऐकणे – 40 मिनिटं
  • वाचणे – 60 मिनिटे
  • लिहिणे – 60 मिनिटं
  • बोलणे -11 ते 15 मिनिटं

ही परीक्षा वर्षातून बर्‍याचदा घेतली जाते आणि वर्षातून दोन वेळा घेतलेल्या परीक्षेचा चा निकाल लावला जातो.ह्या चे जगामध्ये  900 हुन अधिक परीक्षा केंद्र आहेत आणि ही परीक्षा केंद्र 130 देशामध्ये आहेत.मागच्या वर्षी संपूर्ण जगामध्ये 20 लाखाऊन जास्त जणांनी ही परीक्षा दिली आहे.

काही म्हत्वाच्या  नवीन बाबी- IELTS  Marathi Information

IELST Vs TOEFL

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडतो की, IELST Exam  द्यावी की TOFEL Exam  द्यावी. IELST या Exam  ला यु.के ,ऑस्ट्रेलिया, न्यूजलंड या देशांमध्ये जास्त महत्व दिले जाते आणि TOFEL Exam  ला यु.एस आणि कॅनडा या देक्षात जास्त महत्व दिले जाते.तुम्हाला जर यु.एस किंवा कॅनडा मध्ये शिकण्यासाठी जायचे असेल तर तुम्ही TOFEL ची Exam  द्यावी आणि जर तुम्हाला यु.के ,ऑस्ट्रेलिया, न्यूजलंड या देशांमध्ये शिकण्यासाठी जायचे असले तर तुम्ही IELST ही Exam  द्यायला हवी.

IELST Exam  देण्यासाठी वयोमर्यादा काय आहे ?

ही परीक्षा देण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नसते,परंतु तुम्ही 16 वर्षा पेक्षा वय कमी असेल  तर तुमच्यासाठी ही परीक्षा नाहीये.जर तुम्ही 16 वर्षाच्या खालील आहात आणि तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही ती देऊ शकता.

See also  गुगलच्या ए आय पाॅवर मेडिकल चॅट बोट मेड पाल्म टु विषयी माहिती Google AI powered medical chatbot med -paLm 2 information in Marathi

परीक्षा देण्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आहे ?

ह्या साठी कोणतेही शैक्षणिक पात्रता नसते.तुम्हाला जर बाहेरच्या म्हणजे इंग्लिश प्रमुख असणाऱ्या देशात शिकण्यासाठी जायचे असेल तर तुम्ही देऊ शकता.

IELST Exam  चे रजिस्ट्रेशन कसे करायचे ?

  •  पहिल्यांदा  Britsh Council Registeration Page या वेबसाईटवर
  • त्या वेबसाईटवर तुमचे नवीन अकाउंट बनवा.
  •   तुमच्या जवळचे IELST Exam  असणारे परीक्षा केंद्र निवडा.
  •  रजिस्टर करा आणि ऑनलाइन फी पे करा.

काही कारणास्तव आपण Exam  देणार नसू तर भरलेली फी कॅन्सल कशी करायची ?

  • तुम्हीं जर रजिस्ट्रेशन करण्याच्या 5 आठवड्या अगोदर अँप्लिकेशन कॅन्सल केले तर कमीतकमी 25% फी तुम्हाला रिटर्न मिळते.
  • तुम्ही परीक्षे अगोदर 5 आठवड्यापर्यंत अप्लिकेशन कॅन्सल नाही केले तर तुम्हाला फी रिफंड नाही मिळत.
  • समजा तुम्ही ह्या परीक्षेत मध्ये फेल झाला आणि तुम्हाला फी रिटर्न हवी असेल तर,तुम्हाला फी परत मिळत नाही.

IELST Exam चा निकाल कधी लागतो ?

ह्या परीक्षेचा ची ही विशेषतः आहे की या मधील ऑनलाइन मोडचा निकाल लगेच 5-7 दिवसांमध्ये जाहीर केला जातो .तुम्ही जर ऑफलाईन दिली असेल,तर तुमचा निकाल दिल्यानंतर13 व्या दिवशी लागतो.तुम्ही जर ऑनलाइन मोड मध्ये दिली असेल तर तुमचा निकाल 28 दिवसांनी ऑनलाइन स्वरूपात लागतो.

जगामध्ये 140 देशातील 10,000 हुन जास्त ऑर्गनायझेशनमध्ये IELST ह्या Exam  ची मार्क्स स्वीकारली जातात.

IELST Exam  चा इंग्लिश मुख्य भाषा नसणाऱ्या देशातील व्यक्तीना फायदा कसा होतो ?

  • इंग्लिश ही संपूर्ण जगातील प्रत्येक देशामध्ये थोड्या अधिक प्रमाणात बोलली जाते.इंग्लिश बोलता आली पाहिजे,ही काळाची गरज आहे.तु
  • म्हाला बाहेरच्या देशामध्ये जसे की यु.एस,यु.के यांसारख्या मोठया देशांमध्ये शिक्षणासाठी किंवा जॉबसाठी जायचे असेल,तर तुम्हाला इंग्लिश भाषा परफेक्ट जमली पाहिजे.आपल्याला इंग्लिश भाषा किती प्रमाणात जमते याचे आकलन करण्यासाठी IELST ही Exam घेतली जाते.
  • परीक्षा दिल्यानंतर ।निकालावरून तुम्हाला समजेल की आपल्याला किती प्रमाणात इंग्लिश भाषा येते ते.आणि इंग्लिश प्रमुख असणाऱ्या देशांच्या काही युनिव्हर्सिटी मध्ये IELST या Exam ची मार्क्स पाहिली जातात ऍडमिशन वेळी.
See also  मालमत्ता कर म्हणजे काय? मालमत्ता कर भरण्याचे आपल्याला अणि आपल्या परिसरातील लोकांना होणारे फायदे कोणते ? What is Property Tax ?


SIP KNOWLEDGE