गायत्री मंत्र म्हणजे काय? अर्थ व महत्व -Meaning Of Gayatri Mantra In Marathi

गायत्री मंत्र म्हणजे काय?-Meaning Of Gayatri Mantra In Marathi

गायत्री मंत्र हा मंत्रामध्ये जपला जात असलेला एक महामंत्र म्हणुन ओळखला जातो.हा मंत्र लहान मुलांपासुन ते प्रौढ व्यक्तींपर्यत सगळयांनीच जपणे खुप उत्तम आणि फायदेशीर मानले जात असते.

कारण हा मंत्र जपण्याचे अनेक शारीरीक,मानसिक,बौदधिक,धार्मिक आर्थिक आणि अध्यात्मिक लाभ आपल्याला होत असतात.

आजच्या लेखात आपण ह्याच फायद्यांविषयी जाणुन घेणार आहोत.तसेच गायत्री मंत्रातील प्रत्येक शब्दाचा अर्थ देखील समजुन घेणार आहोत.

गायत्री मंत्राचे महत्व तसेच फायदे – Importance And Benefit Of Gayatri Mantra In Marathi

गायत्री मंत्र ही मानवास प्राप्त झालेली एक अमुल्य अशी दैव देणगी आहे.गायत्री मंत्र पापाचा नाश करणारा एक पापनाशक मंत्र आहे.गायत्री मंत्र हा पुण्यवर्धक देखील असतो.

जर आपण रोज गायत्री मंत्राचे पठन केले तर आपली बुदधी अधिक तेज होत असते.याचसोबत आपल्या स्मरणशक्तीत देखील वाढ होताना आपणास दिसुन येत असते.आपल्याला सदबुदधी प्राप्त होते.

आपल्याला जर काही मेंदुचा आजार असेल,कुठलीही गोष्ट वारंवार विसरण्याची समस्या असेल तर ती देखील गायत्री मंत्रामुळे दुर होण्यास आपल्याला बरीच मदत प्राप्त होत असते.

  • गायत्री मंत्राचा जप केल्याने आपल्या शरीरातील मनातील उत्साहात वाढ होते.आपल्या विचारांमध्ये आणि जीवणात सकारात्मकता येते.
  • वाईट विचारांपासून तसेच भावनांपासुन आपले मन मुक्त होत असते.आपल्या मनातील क्रोध देखील शांत होत असतो.
  • आपले मन हे कितीही अशांत तसेच बैचेन असले तरी ह्या मंत्राचा जप केल्याने शांत होऊन जात असते.धार्मिक आणि समाजसेवेचे कार्य करण्यात आपले मन रमु लागते.
  • चारही वेदांपासुन तयार झालेल्या ह्या गायत्री मंत्राचे रोज उच्चारण तसेच जप केल्याने आपल्या जीवणात जेवढेही दुख,पीडा कष्ट असतील त्यांचा नाश होत असतो.आणि आपल्या जीवणात सुखाचा आणि आनंदाचा संचार होण्यास आरंभ होत असतो.
  • जी व्यक्ती गायत्री मंत्राचा जप करते तिचे शरीर नेहमी निरोगी आणि रोगमुक्त राहत असते.आपल्या त्वचेवर एक वेगळेच तेज येत असते.आणि आपणास जीवणामध्ये यश किर्ती प्रसिदधी तसेच अफाट धन देखील प्राप्त होत असते.
  • असे अनेक शारीरीक,मानसिक,बौदधिक,धार्मिक आर्थिक आणि अध्यात्मिक लाभ गायत्री मंत्रामुळे आपणास होत असतात.
  • म्हणुनच ह्या मंत्राचा जप आपण लहानापासुन मोठयांपर्यत सर्वानीच करायला हवा.विशेषकरून शाळेत जात असलेल्या विदयार्थी विदयार्थीनींनी कारण याने त्यांची बुदधी अधिक तेज होत असते.याचसोबत त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये देखील वाढ होत असते.
See also  महात्मा फुले जयंतीच्या शुभेच्छा, संदेश - Mahatma Phule Jayanti Wishes Marathi, Quotes, Pictures

गायत्री मंत्राचा अर्थ काय होतो? – Meaning Of Gayatri Mantra In Marathi

ऊँ भूर्भुव स्व:तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि। धियो यो न: प्रचोदयात्।।

गायत्री मंत्र हा मंत्रामध्ये जपला जात असलेला एक महामंत्र आहे.आता आपण ह्या वरील मंत्रातील एक एक शब्दाचा सखोल अर्थ समजुन घेऊया.

ऊँ हे हिंदु धर्मातील एक प्रमुख चिन्ह आहे.हे परब्रम्हाचे तसेच निर्गुण रूपाचे देखील नाव आहे.याचसोबत याला प्रणव असे देखील संबोधिले जात असते.

ऊँ म्हणजेच ओंकार ह्या शब्दाचा वापर परमेश्वराची स्तुती करण्यासाठी केला जात असतो.ऊँ काराचा जप केल्याने आपणास ह्या जगातील सर्व दिव्य आणि अलौकिक शक्तींचे स्मरण होत असते.

भु म्हणजेच भुमंडळ म्हणजेच हे सर्व पृथ्वीलोक.भुर्व म्हणजे अंतराळ लोक ग्रहमंडळ.स्व: म्हणजेच संपुर्ण स्वर्ग लोक.तत् म्हणजेच परमात्मा.

सवित म्हणजेच परमेश्वर ज्याने हे सर्व निर्माण केले आहे.वरेण्यम म्हणजेच वंदनीय असा वंदन करण्यासारखा.

भर्गो म्हणजेच तेजाचे प्रकाशाचे.देवस्य म्हणजेच सर्व देवतांचा.धीमही म्हणजे ध्यान करणे.

धियो म्हणजेच बुदधी.

यो न म्हणजेच जो.

प्रचोदयात म्हणजेच आपणास सन्मार्गावर चालण्यासाठी प्रेरित तसेच प्रोत्साहित करणे

आणि ह्या सगळयांचा एकत्रित अर्थ असा होतो की ही सर्व पृथ्वी,ग्रह,तारे,आकाशगंगा यांच्या वेगामुळे उत्पन्न होणारा ध्वनी ऊँ हाच परमेश्वराची प्रथम ओळख ऊँ आहे.

तो परमात्मा तसेच परमेश्वर जो अनेक रुपांमध्ये प्रकाशाच्या रूपात प्रकट आहे तो आपणा सर्वासाठी वंदनीय आणि पुज्य असा आहे.

आपण त्याच परमेश्वराच्या रूपाचे रोज ध्यान करून रोज त्याला अशी प्रार्थना करावी की त्याने सदैव आपल्या बुदधीला सन्मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करावे.जेणेकरून आपले सतत इकडे तिकडे धावत असलेले हे अस्थिर आणि चंचल मनाला आपली बुदधी नियंत्रित करू शकेल.

गायत्री मंत्राचा जप आपण कधी आणि किती वेळा करायला हवा?

गायत्री मंत्राचा जप आपण कधीही आणि कोठेही असताना सहज करू शकतो.पण शास्त्रात असे म्हटले गेले आहे की गायत्रीमंत्राचा आपण किमान तीन वेळा जप करणे अधिक उपयुक्त आणि फायदेशीर ठरत असते.

See also  सेल्स आणि मार्केटिंग मधील फरक - Difference Between Sales And Marketing In Marathi

सुर्योदय होण्याच्या आधी म्हणजेच पहाटेच्या सुमारास.किंवा सुर्योदय होण्याच्या आधीच्या कालावधीत कधीही.

● मध्यांतराच्या काळात दुपारी

● आणि संध्याकाळच्या वेळी सुर्य अस्त होण्याच्या काही काळ अगोदर.

1 thought on “गायत्री मंत्र म्हणजे काय? अर्थ व महत्व -Meaning Of Gayatri Mantra In Marathi”

  1. माझ्या म्हणण्यानुसार गायत्री तीन डायमेंशन्स आहेत !
    चुकलो असेन तर मला सांगा !

Comments are closed.