बार अणि बेन्च म्हणजे काय? अर्थ व त्यातील फरक – Bar and Bench in Marathi

बार अणि बेन्च म्हणजे काय? अर्थ व त्यातील फरक – Bar and Bench in Marathi

मित्रांनो आज आपण न्यायालयाचे दोन प्रमुख घटक बार अणि बेंच या दोघांविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.

बार अणि बेंच या दोघांमध्ये काय संबंध असतो?या दोघांचे न्यायव्यवस्थेत महत्व अणि भुमिका काय आहे?इत्यादी सर्व बाबींचा आढावा आजच्या आर्टिकल मध्ये आपण घेणार आहोत.

बार म्हणजे काय?Bar meaning in Marathi

बार हा एक सामान्य शब्द आहे जो कोर्टात वकिलीचा सराव करण्यासाठी परवाना लायसन्स प्राप्त झालेल्या वकिलांकरीता वापरला जात असतो.बार ही एक जागा आहे जिथे वकिल उभे राहत असतात.

बार हा इंग्लंड ह्या देशात प्रसारीत करण्यात आलेला शब्द आहे.वकिल अणि न्यायाधीश यांना विभिन्न करण्यासाठी वेगळे करण्यासाठी प्रामुख्याने वापरला जात असतो.

बार इन लाँ म्हणजे काय?Bar in law meaning in Marathi

बार इन लाँ म्हणजे वकिलांची संघटना तसेच गट ज्याला कोर्टात सराव करण्यासाठी राज्य बार काऊंसिलने लायसन्स दिले आहे.

हे लायसन्स वकिलांना लाँ काँलेजमधुन एल एल बी ची पदवी प्राप्त केल्यावर तज्ञ अनुभवी वकिलाच्या देखरेखीखाली वकिलीचे प्रक्षिक्षण घेतल्यानंतर दिले जाते.

बेन्च म्हणजे काय?Bench meaning in Marathi

बेन्च हे न्यायाधीशांच्या पँनेलचे महत्वाचे खंडपीठ न्यायपीठ असते.जे कोर्टरूममध्ये बसविले जात असते.बेन्च ही न्यायालयाच्या खोलीतील अशी एक जागा असते जिथे न्यायाधीश बसलेले असतात.आपले आसन ग्रहण करत असतात.

See also  ग्रीन टी के फायदे - Benefits of green tea in Hindi

बेंच हा शब्द न्यायपालिकेमधील सदस्यांचे वर्णन करण्यासाठी वापरला जात असतो.

विधी व्यवसायातील सर्व सभासदांची दोन गटात विभागणी केली जाते.एक गट बारचा असतो अणि दुसरा बेन्चचा.

यात कोर्टरूमचे दोन भागात विभाजन केले जाते एक भाग वकिलांसाठी असतो अणि दुसरा भाग हा न्यायाधीशांसाठी असतो.

बार अणि बेंच हा शब्द न्यायालयाचे दोन भाग न्यायाधीश अणि वकिल यांना वेगळे दाखवण्यासाठी दर्शविण्यासाठी वापरला जात असतो.

बार अणि बेंच मधील परस्परसंबंध अणि दोघांची न्यायव्यवस्थेमधील भुमिका – Bar and bench relationship and their role in Marathi

बार अणि बेंच ही दोघेही रथाच्या दोन चाकांप्रमाणे आहेत.जसे रथ चालण्यासाठी रथाचे दोघेही चाक सुरक्षित संतुलित असणे गरजेचे आहे.एका चाकावर रथ कधीच चालत नाही.

तसेच न्यायालयातील कायद्याचा सर्व कारभार व्यवस्थित चालण्यात हे दोघेही आपापली महत्वाची भुमिका बजावत असतात.या दोघांमुळे कायद्याचा कारभार चालत असतो.बार अणि बेंच हे न्यायालयाची दोन प्रमुख अंगे आहेत.

वकिल अणि न्यायाधीश दोघेही एकमेकांशी परस्परसंबंधित,एकमेकांशी निगडीत आहे.दोघांशिवाय कोर्टात न्याय होणे शक्य नसते.कारण वकिल हे निरपराधांना न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टात आपापल्या आशिलाच्या वतीने योग्य ते पुरावे सादर करून केस लढत असतात अणि न्यायाधीश हे सर्व पुरावे लक्षात घेऊन खटला नीट समजुन घेऊन योग्य तो अंतिम निर्णय घेऊन न्याय देण्याचे काम करत असतात.

म्हणुन या दोघांत चांगले संबंध असणे फार गरजेचे आहे.दोघांनी एकमेकांचा आदर करायला हवा एकमेकांविषयी निंदा वगैरे अजिबात करू नये.

वकिलाने काय करायला हवे?काय करू नये कोणत्या नियमांचे पालन करावे?

● वकिलाने न्यायाधीशाने घेतलेल्या अंतिम निर्णयावर टिका टिप्पणी करू नये आक्षेप घेऊ नये

● न्यायाधीशांचा अपमान होईल असे वागु नये.त्यांच्या निर्णयाचा सम्मान करायला हवा.त्यांचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे असे वाटत असल्यास न्यायालयात अपील करायला हवी.

● न्यायाधीश त्रस्त होतील वैतागतील असे कुठलेही वर्तन न्यायालयात करू नये.

See also  महाराणा प्रताप जयंती शुभेच्छा २०२३ मराठीत । Maharana Pratap Jayanti 2023 Wishes In Marathi

● आपल्या बाजुने निर्णय देण्याकरीता न्यायाधीशांवर कुठलाही दबाव आणु नये.

● न्यायाधीशांच्या कुठल्याही वर्तनाविषयी वकिलास कुठलीही तक्रार असेल तर त्यांनी बार असोसिएशन मार्फत आपले मत न्यायाधीशांसमोर मांडायला हवे.

न्यायाधीशांनी काय करायला हवे कोणत्या नियमांचे पालन करायला हवे?

● न्यायाधीश यांनी देखील वकिलाला मान सम्मान द्यायला हवा.वकिलाशी कुठलेही गैरवर्तन करु नये.

● दोघे बाजुच्या वकिलांचे मत व्यवस्थित ऐकून घ्यायला हवे अणि कुठलाही पक्षपात न करता निष्पक्षपणे न्यायाची बाजु समजुन योग्य तो निर्णय द्यायला हवा.

● केसला रिप्रेझेंट करण्यासाठी न्यायाधीशाने वकिलाला पर्याप्त संधी देखील द्यायला हवी.

● जेव्हा वकिल साक्षीदाराचे परीक्षण करत असतो तेव्हा न्यायाधीशाने त्यात कुठलाही व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू नये.

● कुठल्याही खटल्यावर लवकरात लवकर सुनावणी करण्याचा सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न करावा.

न्यायाधीश वकिल आपले मत मांडत असताना कधी मध्यस्थी करू शकतात?

● वकिल एकच मुददा पुन्हा पुन्हा मांडत असेल तेव्हा न्यायाधीश न्यायालयाचा अमुल्य वेळ वाचवण्यासाठी तो वाया जाऊ न देण्यासाठी मध्यस्थी करू शकतात.

● दोन बाबींमधील परसपरसंबंध जाणून घेण्यासाठी,एखाद्या मुददयाचे स्पष्टीकरण प्राप्त करण्यासाठी,कुठल्याही मुददयावर कोर्टाचा दृष्टिकोण व्यक्त करण्यासाठी न्यायाधीश मध्यस्थी करू शकतात.किंवा वकिल एखादा खटला लांब ओढण्याचा प्रयत्न करत असतील तर तेव्हा सुदधा न्यायाधीश मध्यस्थी करू शकतात.