सी अणि सी प्लस प्लस मधील फरक – Difference between c and c++ in Marathi

सी अणि सी प्लस प्लस मधील फरक difference between c and c++ in Marathi

आपल्यातील खुप विदयार्थी असतात.जे डिप्लोमा इंजिनिअरींगमध्ये प्रोग्रामिंग लँग्वेजचा अभ्यास करत असतात.

कंप्यूटर डिप्लोमा अणि इंजिनिअरींगच्या अभ्यासक्रमात आपणास सी अणि सी ++ ह्या दोन प्रोग्रामिंग लँग्वेजचा अभ्यास करावा लागत असतो.

आपल्यातील खुप विदयार्थीच्या मनात ही शंका असते की सी अणि सी ++ मध्ये काय फरक असतो?ह्या दोघे लँग्वेज सेम आहे का वेगवेगळया आहेत.

तसेच जेव्हा आपण डिप्लोमा इंजिनिअरींगचे शिक्षण पुर्ण करून जेव्हा जाँबसाठी इंटरव्यू द्यायला जात असतो तेव्हा देखील आपणास सी अणि सी ++ मधील फरक विचारला जात असतो.खुप जणांना यातील फरक माहीत नसल्याने याविषयी सांगणे कठिन जात असते.

म्हणुन आजच्या लेखात आपण सी अणि सी ++ मधील फरक जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपल्या मनातील सर्व शंका दुर होतील.

सी अणि सी ++ मधील साम्य –

● सी अणि सी ++ या दोघेही प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत.

सी लँग्वेज -C language :

● सी लँग्वेज ही फंक्शन प्रोग्रँमिंगला सपोर्ट करणारी भाषा आहे.

● सी लँग्वेज ही एक मध्यम पातळीवरची म्हणजेच middle level language आहे.

● सी लँग्वेजमध्ये इनपुट देण्यासाठी आपण scanf फंक्शनचा वापर करत असतो.अणि आऊटपुट प्राप्त करण्यासाठी रिझल्ट मिळविण्यासाठी आपण printf ह्या फंक्शनचा वापर करत असतो.

● सी लँग्वेजमध्ये आपणास inheritance चा वापर करता येत नसतो.

● सी लँग्वेज मधील कुठलीही फाईल आपण डाँट सी.c ह्या एक्सटेंशनने सेव्ह करत असतो.

● सी लँग्वेज ही सी++ चा सबसेट म्हणुन ओळखली जाते.

● सी लँग्वेज ही एक स्ट्रक्चरल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे.

● सी लँग्वेज मध्ये header file म्हणुन stdio.h चा वापर करतो.

● सी लँग्वेज मध्ये पाँलीमाँरपिझम शक्य होत नसते.पाँलिमाँपिझम म्हणजे एकच नाव अणि त्याचे कार्य विविध प्रकारचे असणे याला पाँलीमाँरपिझम असे म्हणतात.

See also  जिमेल -डिलीट झालेले महत्वाचे ईमेल कसे रिकव्हर करावे?- How To Recover Deleted Email In Gmail

● सी लँग्वेजमध्ये आँपरेटर ओव्हरलोडिंग होत नसते.आँपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे एकाच आँपरेटरचा विविध अर्थासाठी पुन्हा पुन्हा वापर करणे.

● फंक्शन अणि डेटामध्ये मँपिंग करणे सी लँग्वेज मध्ये अवघड असते.

● सी हे एक प्रोग्रामिंग लँग्वेज मधील जुने व्हरझन आहे ज्यात आपणास काही फिचर उपलब्ध नव्हते.इन्हेरीटन्सचा वापर करू शकत नाही,यात पाँलीमाँपिझम शक्य होत नाही,आपरेटर ओव्हरलोडींग होत नही.फंक्शन अणि डेटाला मँप करणे अवघड जाते.

● सी लँग्वेजला 1970 मध्ये अमेरिका मधील शास्त्रज्ञ डेनिस रीची यांनी बेल लँब्रोटरीत विकसित केले होते.

● सी लँग्वेजचा वापर मायक्रोसाँफ्ट,ओरँकल डेटाबेस,माय एसक्यु एल विंडोज,कर्नेल,टेलिग्राम मैसेंजर,इत्यादी मध्ये केला जातो.

सी प्लस प्लस C++ language :

● सी लँग्वेज ही उप्स कंसेप्टला object oriented programming सपोर्ट करणारी भाषा आहे.

● सी प्लस प्लस ही एक उच्च पातळीवरची म्हणजेच high level language आहे.

● सी प्लस प्लस मध्ये आपण इनपुट देण्यासाठी cin>> ह्या फंक्शनचा वापर केला जात असतो तर cout<< ह्या फंक्शनचा वापर आऊटपुट तसेच रिझल्ट प्राप्त करण्यासाठी केला जात असतो.● सी प्लस प्लस मध्ये आपणास inheritance फंक्शनचा वापर करता येत असतो.● सी ++ लँग्वेज मधील कुठलीही फाईल आपण डाँट सीपीपी.cpp ह्या एक्सटेंशनने सेव्ह करत असतो.● सी ++ लँग्वेज ही सी लँग्वेजचा सुपरसेट म्हणुन ओळखली जाते.● सी ++ लँग्वेज ही एक आँब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे.● सी ++मध्ये header file म्हणुन iostream.h चा वापर केला जात असतो.● सी ++ लँग्वेज मध्ये पाँलीमाँरपिझम शक्य होत असते.पाँलिमाँरपिझम हे सी ++ लँग्वेजचे मुख्य वैशिष्ट्य आहे.पाँलिमाँरपिझम म्हणजे एकच नाव अणि त्याचे कार्य विविध प्रकारचे असणे याला पाँलीमाँरपिझम असे म्हणतात.● सी ++ मध्ये आँपरेटर ओव्हरलोडिंग होत असते.कारण सी ++ मध्ये आँपरेटर ओव्हरलोडिंग हे मेन फिचर असते.● सी ++मध्ये आपण आँब्जेक्टचा वापर करून फँक्शन अणि डेटाची मँपिंग करू शकतो.

See also  Google कर्मचाऱ्यांना मोफत स्नॅक्स, लॉन्ड्री सेवा आणि इतर भत्ते देणे करणार बंद । Google to stop offering free snacks to employees
● सी ++ हे एक सी लँग्वेजचे मधील नवे व्हरझन आहे ज्यात आपणास जे फिचर सी मध्ये उपलब्ध नव्हते.ते सर्व उपलब्ध होतात जसे की यात आपण इन्हेरीटन्सचा वापर करू शकतो,यात पाँलीमाँरपिझम शक्य होत असते,आँपरेटर ओव्हरलोडींग होते.फंक्शन अणि डेटाला मँप करणे सोपे जाते.● सी ++ह्या लँग्वेजला बजर्नी स्ट्राँप यांनी यू एस ए मधील बेल लँब्रोटरीत विकसित केले होते.● सी ++ लँग्वेजचा वापर मायक्रोसाँफ्ट आँफिसमध्ये,गुगल क्रोममध्ये,थ्री डी गेम्स मध्ये तसेच विविध प्रोग्रामिंग साठी केला जात असतो.