क्रेडिट लाईन अणि लाईन आँफ क्रेडिट म्हणजे काय? – Credit line and Line of credit meaning in Marathi

क्रेडिट लाईन अणि लाईन आँफ क्रेडिट म्हणजे काय? – Credit line and Line of credit meaning in Marathi

लाईन आँफ क्रेडिट क्रेडिट लाईन या दोघांचाही अर्थ एकच होतो.हे दुसरे काहीही नसुन एक प्रकारचे कर्ज आहे.यात आपणास खर्च करण्यासाठी उधार तसेच कर्जाच्या स्वरूपात एक निश्चित रक्कम प्राप्त होत असते.

ह्या उधार तसेच कर्जामध्ये मिळालेल्या रक्कमेत आपण जेवढी रक्कम खर्च करत असतो त्याच रक्कमेवर आपणास व्याज भरावे लागते बाकी जी रक्कम आपण खर्च केलेली नाहीये तिच्यावर आपणास कुठलेही व्याज तसेच दंड वगैरे आकारले जात नसते.

अणि जी रक्कम आपण खर्च करत नाही ती रक्कम देखील क्रेडिट लाईनवर तशीच शिल्लक राहत असते.

क्रेडिट लाईनमधील जेवढया पैशांचा आपण वापर करत असतो ते पैसे आपण ठरलेल्या एका निश्चित कालावधीमध्ये एकाचवेळी परत करू शकतो.किंवा टप्या टप्याने देखील फेडु शकतो.

ह्या लाईन आँफ क्रेडिटमध्ये किती व्याज दर आकारले जाईल कर्ज घेण्याचे नियम काय असणार हे सर्व कर्ज देत असलेली वित्तीय संस्था लोन अँप ठरवत असते.

लाईन आँफ क्रेडिट इशु करण्यासाठी आधार कार्ड आणि पँन कार्ड व्हेरीफाय करण्यात येते.

लाईन आँफ क्रेडिटचा – क्रेडिट लाईनचा वापर आपणास कुठे कुठे करता येतो?

लाईन आँफ क्रेडिटचा वापर आपणास कुठल्याही खर्चासाठी करता येतो मुलांची शाळेची टयुशनची फी भरण्यासाठी,दवाखान्याचे बील भरण्यासाठी,घराच्या बांधकामासाठी,एखादी वस्तु दूकानातुन सामान वगैरे खरेदी करण्यासाठी इत्यादी.

See also  गुगल फोटो लाँक फोल्डर कसे वापरावे? Google Photos Locked Folder how to set up it?

क्रेडिट लाईन तसेच लाईन आँफ क्रेडिटचे कोणकोणते फायदे असतात?

● जेवढी रक्कम आपण क्रेडिट लाईनमधून खर्च करतो तेवढयाच रक्कमेवर आपणास व्याज दर आकारले जात असते.

● यात घेतलेली पुर्ण रक्कम आपण वापरली पाहिजे असे कुठलेही बंधन देखील आपल्यावर लादले जात नाही.

● जेवढया पैशांची आपणास सध्या गरज आहे तेवढीच रक्कम आपणास यातुन काढता येत असते.

● क्रेडिट लाईनमधील ज्या रक्कमेचा आपण वापरच केला नाहीये तिच्यावर आपणास दंड चार्ज वगैरे द्यावा लागत नाही.

● काही क्रेडिट लाईनसोबत आपणास धनादेश ड्राफ्ट एटीयम,क्रेडिट कार्ड अशा इतर सुविधा देखील प्राप्त होत असतात.

● एक रक्कम जमा करून झाल्यावर आपली दुसरी रक्कम काढण्यासाठी क्रेडिट लाईन यात तयार होऊन जाते.मागचे रेकाँर्ड चांगले असल्यास आपल्या नवीन क्रेडिट लाईनमध्ये देखील वाढ होत जाते.

● यात आपण एकदा पैसे काढून जमा केल्यानंतर पुन्हा पैसे काढु शकतो.

क्रेडिट लाईन तसेच लाईन आँफ क्रेडिटचे कोणकोणते तोटे असतात?

● यात आपणास जास्त व्याजदर देखील भरावे लागत असते.

● वेळेवर कर्जाची रक्कम परत न केल्यास आपणास दंड भरावा लागु शकतो.

● मार्केटमध्ये आज हजारो लोन अँप्स उपलब्ध आहेत त्यात काही खरया आहेत तर काही फेक लोन अँप्स सुदधा आहेत ज्या कर्ज देण्याच्या नावाखाली आपली फसवणुक करत असतात.सर्वसामान्य माणसाला आपल्या जाळयात ओढत असतात.

● ह्या सुविधेमुळे आपणास कधीही पैसे काढता येत असतात ज्याने नियमित निरर्थक निरूपयोगी वस्तुंची खरेदी केल्याने आपणास अत्याधिक खर्च करण्याची सवय लागू शकते.

● क्रेडिट लाईनमध्ये मिळणारी कर्जाची रक्कम आपल्या क्रेडिट स्कोर रेकाँर्डवरून निर्धारीत करण्यात येते.

लाईन आँफ क्रेडिटचे प्रकार –

क्रेडिट लाईन मधील जोखिमेस लक्षात घेऊन क्रेडिट लाईनचे आपण दोन भागात विभाजन करू शकतो.

1)secured line of credit -सुरक्षित लाईन आँफ क्रेडिट

See also  Personal Finance शी संबंधित महत्वाचे 25 शब्द - Personal Finance important terms in Marathi

यात आपली एखादी मालमत्ता संपत्तीची कागदपत्रे गहान ठेऊन क्रेडिट जारी केले जाते.

अणि जर आपण हे लोन परत केले नही तर लोन देणारी संस्था कंपनी आपल्या गहाण ठेवलेल्या संपत्तीच्या कागदपत्रांवर मालमत्तेवर जप्ती देखील आणु शकते.किंवा आपली नुकसान भरपाई करण्यासाठी कंपनी तसेच संस्था त्यांचा लिलाव देखील करू शकते.म्हणुन हे लोन सेफ लाईन आँफ क्रेडिट म्हणुन ओळखले जाते.

2) unsecured line of credit -असुरक्षित लाईन आँफ क्रेडिट

यात आपली कुठलीही मालमत्ता संपत्तीची कागदपत्रे गहान ठेऊन क्रेडिट जारी केले जात नाही.

अणि जर आपण हे लोन परत केले नही तर लोन देणारी संस्था कंपनी आपल्या गहाण ठेवलेल्या संपत्तीच्या कागदपत्रांवर मालमत्तेवर जप्ती देखील आणु शकत नसते.किंवा आपली नुकसान भरपाई करण्यासाठी कंपनी तसेच संस्था त्यांचा लिलाव देखील करू शकत नाही.म्हणुन हे लोन अनसेफ म्हणजेच असुरक्षित लाईन आँफ क्रेडिट म्हणुन ओळखले जाते.