आंतरराष्टीय भ्रष्टाचार विरोधी दिवस महत्व अणि इतिहास – International Anti Corruption Day History And Importance In Marathi

आंतरराष्टीय भ्रष्टाचार विरोधी दिवस महत्व अणि इतिहास – International Anti Corruption Day

आंतरराष्टीय भ्रष्टाचार विरोधी दिवस कधी साजरा केला जात असतो?

आंतरराष्टीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दरवर्षी 9 डिसेंबर रोजी साजरा केला जात असतो.संयुक्त राष्टाच्या देखरेखीत हा दिवस संपुर्ण विश्वात दरवर्षी साजरा करण्यात येत असतो.

आंतरराष्टीय भ्रष्टाचार विरोधी दिवस सर्वप्रथम कधी साजरा केला गेला होता?

आंतरराष्टीय भ्रष्टाचार विरोधी दिवस सर्वप्रथम 2005 मध्ये साजरा करण्यात आला होता.

आंतरराष्टीय भ्रष्टाचार विरोधी दिवस का साजरा केला जात असतो?

आंतरराष्टीय भ्रष्टाचार विरोधी दिवस हा समाजात होत असलेल्या भ्रष्टाचाराविरूदध जागृकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी साजरा केला जात असतो.

2022 मधील आंतरराष्टीय भ्रष्टाचार विरोधी दिनाची थीम कोणती आहे?

आपला हक्क अणि आपली भुमिका भ्रष्टाचाराला नाही म्हणने ही आहे.Our Right And Our Role Is Say No To Corruption.

आंतरराष्टीय भ्रष्टाचार विरोधी दिवस का अणि कसा साजरा केला जात असतो?

  • आंतरराष्टीय भ्रष्टाचार विरोधी दिनी जागोजागी भ्रष्टाचार विरोधी चर्चासत्र अणि मोहीमांचे आयोजन केले जाते.
  • जागोजागी भ्रष्टाचार विरोधी स्टिकर लावले जातात पाँम्पलेट वाटले जातात.टिव्ही तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातुन भ्रष्टाचार विरोधी प्रचार प्रसार केला जातो.
  • विविध सरकारी तसेच गैरसरकारी संस्था कार्यालयांमध्ये देखील हा दिवस मोठया उत्साहात साजरा केला जातो.
  • शाळा काँलेजात भ्रष्टाचार विरोधी भाष्य करणारया निबंध काव्य वाचन स्पर्धा आयोजित केल्या जात असतात.
  • भ्रष्टाचार समाजाला लागलेला कलंक आहे,भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड,एक गंभीर समस्या आहे हे सांगण्यासाठी भ्रष्टाचाराचे दुष्परिणाम जगाला पटवून दिले जाते.
  • ठिकठिकाणी स्थानिक अधिकारयांकडुन सार्वजनिक पत्रकाचे वितरण केले जाते.जनतेला समाजाला भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी त्या विरूदध आवाज उठवण्यासाठी प्रेरित केले जाते.
  • आजही जगभरात अनेक अशा संस्था संघटना आहेत ज्या भ्रष्टाचाराला रोखण्याचे हे अनमोल काम करत आहेत त्याविरूदध लढा देण्याचे काम करता आहेत.
See also  Yoga poses images with names - International Yoga Day 2022

आंतरराष्टीय भ्रष्टाचार विरोधी दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतु काय आहे?

समाजाला भ्रष्टाचार मुक्त करणे,समाजातील भ्रष्टाचाराचा संपुर्ण नायनाट करणे लोकांना भ्रष्टाचार मुक्त समाजाचे महत्व पटवून देणे.

कुठल्याही देशाच्या सर्वागिन विकासासाठी,प्रगतीसाठी देशातील वातावरण भ्रष्टाचार मुक्त होणे किती गरजेचे आहे हे जगाला या दिवशी पटवून दिले जाते.

सर्व देशांनी एकत्र येऊन ह्या जागतिक समस्येविरूदध लढा दिला पाहिजे ह्या हेतुने दरवर्षी आंतरराष्टीय भ्रष्टाचार विरोधी दिवस संपुर्ण जगभरात साजरा केला जात असतो.

हा दिवस प्रत्येक वर्षी वेगवेगळया थीमसोबत साजरा केला जात असतो.

हा दिवस एक प्रतीक तसेच चिन्ह आहे प्रत्येक देशाच्या विकास,शांतता अणि सुरक्षिततेचे.

आंतरराष्टीय भ्रष्टाचार विरोधी दिवस इतिहास –

आंतरराष्टीय भ्रष्टाचार विरोधी दिनाचा आरंभ 3 आँक्टोंबर 2003 पासुन झाला.कारण 3 आँक्टोंबर 2003 ला संयुक्त राष्टाने भ्रष्टाचारा विरूदध आंतरराष्टीय पातळीवर परिषद आयोजित केली होती.

ह्या सभेतच 9 डिसेंबर हा भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणुन घोषित करण्यात आला होता.त्यानंतर 2005 पासुन हा भ्रष्टाचार विरोधी दिवस आंतरराष्टीय स्तरावर संपुर्ण जगात पाळला जाऊ लागला.