वेड काय आहे? ved meaning in marathi

Table of Contents

वेड काय आहे?ved meaning in marathi

वेड हा एक मराठी भाषेतील एक ड्रामा मुव्ही म्हणजेच नाट्य चित्रपट आहे.ज्याने सैराट प्रमाणेच काही दिवसातच रसिक प्रेक्षकांना वेड करून सोडले आहे

वेड हा चित्रपट कधी रिलीज करण्यात आला होता?

वेड हा मराठी भाषेतील चित्रपट २०२२ मध्ये म्हणजेच ३० डिसेंबर २०२२ रोजी सर्व सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला होता.

वेड चित्रपट कुठे रिलीज करण्यात आला आहे?

वेड हा एक मराठी भाषेतील चित्रपट आहे जो भारतात रिलीज करण्यात आला आहे.

खासकरून महाराष्ट्रात मराठी भाषिकांसाठी मराठी चित्रपट रसिकांसाठी हा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे

वेड चित्रपटाचा दिग्दर्शक कोण आहे?

नुकताच काही आठवड्यांपूर्वी रिलीज झालेल्या वेड ह्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता रितेश देशमुख यांनी केले आहे.

अणि ह्या चित्रपटाच्या निर्मितीचे काम रितेश देशमुख याची पत्नी जेनेलिया डिसुजा हिने बघितले आहे.

या चित्रपटाच्या माध्यमातून रीतेशने दिग्दर्शन क्षेत्रात त्याचे पहिले पाऊल टाकले आहे.

वेड चित्रपटातील प्रमुख कलाकार कोण कोण आहे?

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुजा हेच वेड ह्या चित्रपटाच्या प्रमुख कलाकारांच्या भुमिकेत आपणास दिसून येत आहे.

See also  गूगल क्लासरुम विषयी संपूर्ण माहीती - Google classroom Information in Marathi

म्हणजे दिग्दर्शन अणि निर्मिती सोबत रितेश आणि जेनेलिया यांनी ह्या चित्रपटात प्रमुख कलाकाराची भूमिका देखील पार पाडली आहे.

याचसोबत ह्या चित्रपटात रितेश आणि जेनेलिया यांना जोडी म्हणुन साथ देताना आपणास प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेता अशोक सराफ,बाॉलीवुड अभिनेता सलमान खान पाहुणा कलाकार तसेच विद्याधर जोशी,जिया शंभर,शुभ़ंकर तावडे, सिद्धार्थ जाधव, जितेंद्र जोशी,अनिल राजपुत हे देखील दिसुन येणार आहेत.

वेड चित्रपटाला संगीत कोणी दिले आहे?

वेड ह्या मराठी चित्रपटाला अजय अतुल यांनी संगीत दिले आहे.

वेड हा कोणत्या भाषेतील चित्रपट आहे?

वेड हा एक मराठी भाषेतील नुकताच काही दिवसांपूर्वी म्हणजेच ३० डिसेंबर २०२२ रोजी रिलीज झालेला चित्रपट आहे.

वेड हा चित्रपट कशाचा रिमेक आहे?

वेड हा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलगु भाषेतील चित्रपट मजिली हीचा रिमेक आहे.

वेड ह्या चित्रपटाचा एकुण अवधी काय आहे?

वेड हा मराठी भाषेतील चित्रपटाचा एकुण अवधी १५० मिनिटे इतका आहे.

वेड ह्या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये एकुण किती खर्च करण्यात आला आहे?

वेड ह्या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये जवळजवळ १५ ते १६ कोटी इतका खर्च करण्यात आला आहे.

बाॅक्स आॅफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट कोणता आहे?

वेड हा बाॅक्स आॅफिस ३५.७७ करोड इतकी सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरलेला आहे.

वेड चित्रपटाने कोणत्या मराठी चित्रपटाचा विक्रम मोडीत काढला आहे?

वेड चित्रपटाने एकाच दिवसात सर्वात जास्त कमाई करणारया मराठी चित्रपट सैराटला मागे टाकले आहे वेड ह्या चित्रपटाने एकाच दिवसात पाच कोटी पेक्षा अधिक कमाई केली आहे.

याचसोबत अकरा दिवसांच्या कालावधीत ३५.७० कोटी इतकी सर्वाधिक कमाई करणारा हा रितेश देशमुख याचा प्रथम चित्रपट देखील आहे.

ह्या चित्रपटाने रितेश देशमुख याचा ३५ कोटीची कमाई करणारया चित्रपट लय भारी याला देखील मागे टाकले आहे.

सैराट प्रमाणेच ह्या चित्रपटाला महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेर असणाऱ्या प्रेक्षकांकडुन देखील सर्वाधिक पस़ंती अणि प्रतिसाद दिला जात आहे.

See also  सर्टिफिकेट आॉफ डिपाझिट म्हणजे काय? Certificate of deposit meaning in Marathi

वेड चित्रपटाला आय एम डिबी वर किती रेटिंग देण्यात आली आहे?

वेड चित्रपटाला आय एम डिबी वर १० पैकी ७.९ इतकी रेटिंग देण्यात आली आहे.

वेड चित्रपटाने पहिल्याच दिवशी किती कमाई केली?

वेड चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी दोन कोटी पेक्षा अधिक कमाई केली आहे.

 

चित्रपटातील कथेचा थोडक्यात परिचय –

वेड ह्या चित्रपटामध्ये आपणास सत्या नावाच्या युवकाची कथा पाहायला मिळते.ज्याला क्रिकेटचे अणि गर्ल फ्रेंडच्या प्रेमाचे खुप वेड आहे.

जेव्हा सत्याला क्रिकेट मध्ये पाहिजे तसे यश प्राप्त होत नाही अणि त्याची मैत्रीण देखील त्याला सोडून जाते तेव्हा सत्या व्यसन करू लागतो.

सत्या नावाचा हा युवक एका रेल्वे काॅलनी मध्ये वास्तव्यास असतो.सत्याचे स्वप्न असते की त्याने रेल्वे क्रिकेट टीमकडुन खेळावे टीम इंडियाचे प्रतिनिधित्व पार पाडावे.यातच तो निशा नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो.

१२ वर्षांनंतर सत्या एक मद्यपी व्यक्ती दाखवलेला आहे जो दूखी निराश होऊन आपल्या प्रेमाची वाट बघत आहे.सत्याचे श्वावनी नावाच्या मुलीशी विवाह होतो जिचे बालपणापासून सत्यावर खुप प्रेम असते.

इथे आपणास हे बघायला मिळेल कोणाच्या प्रेमामध्ये अधिक वेडेपणा आहे सत्याच्या मनात असलेल्या निशासाठीच्या प्रेमात की श्वावणीच्या मनात असलेल्या सत्याविषयी असलेल्या प्रेमामध्ये.
‘वेड चित्रपटातील गाण्यांचे नाव –

● बेसुरी

● वेड तुझा

● सुख कळाले

● वेड लावले