औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू – Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2023 In Marathi

औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू – Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2023 In Marathi


औरंगाबाद महानगरपालिका मध्ये विविध पदांवर रिक्त ठिकाणी पात्र उमेदवारांची भरती केली जात आहे.या भरतीविषयी आॅफिशिअल नोटीफिकेशन देखील जारी करण्यात आले आहे.

उमेदवारांनी अर्ज कुठे अणि कसा करायचा आहे?

जे उमेदवार खालील पदांवर काम करण्यासाठी इच्छुक तसेच पात्र आहेत त्यांनी खालील रिक्त पदांसाठी आॅफलाईन पद्धतीने आपले अर्ज १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत खाली दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

आरोग्य विभाग महानगरपालिका मुख्य कार्यालय,टाऊन हॉल औरंगाबाद

 Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2023 अर्ज करण्याची अंतिम तारीख –

सदर पदांसाठी पात्र उमेदवारांना १६ फेब्रुवारी २०२३ च्या आत आपला अर्ज सादर करायचा आहे.

नोकरीचे ठिकाण –

ज्या उमेदवारांची भरती दरम्यान अंतिम निवड केली जाईल त्यांना औरंगाबाद येथे नोकरीची संधी प्राप्त होणार आहे.

विभागाचे नाव- औरंगाबाद महानगरपालिका

भरती केल्या जात असलेल्या रिक्त पदांचे नाव –

  • १) पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी-एकुण जागा -१६
  • २) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी-एकुण जागा -३ जागा
  • ३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ-एकुण जागा -८ जागा
  • ४) औषधनिर्माता-एकुण जागा -७ जागा
  • ५) स्टाफ तसेच नर्स-एकुण जागा -१२ जागा
  • ६) फील्ड माॅनिटर-एकुण जागा -२
  • ७) एसटीएस-एकुण जागा -१ जागा

वयोमर्यादा अट-

वरील सर्व पदांसाठी वयोमर्यादा अट ६५ ते ७० वर्ष इतकी ठेवण्यात आली आहे.

परीक्षा शुल्क –

जे उमेदवार ओपन कॅटॅगरी मधील आहेत त्यांना १५० रूपये इतकी परीक्षा फी भरावी लागेल.तर जे उमेदवार एस सी एस टी कॅटॅगरी मधील आहेत त्यांना १०० रूपये इतकी परीक्षा फी भरावी लागणार आहे.

See also  फ्रंटऑफिस एक्झिक्युटिव्ह कसे बनायचे?How to become front office executive

आॅफिशिअल वेबसाईट –

औरंगाबाद महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट Aurangabadmahapalika.Org ही आहे.

पदानुसार ठेवण्यात आलेल्या शैक्षणिक पात्रतेच्या अटी-

१) पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी उमेदवाराने एमबीबीएस किंवा समकक्ष पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.तसेच त्याने रोटरी इंटर्नशिप देखील पुर्ण केलेली असावी.

२) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी या पदासाठी देखील उमेदवाराने एमबीबीएस किंवा समकक्ष पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.तसेच त्याने रोटरी इंटर्नशिप देखील पुर्ण केलेली असावी.

३) स्टाफ तसेच नर्स या पदासाठी उमेदवाराने जीएन एम अभ्यासक्रमासह बारावी उत्तीर्ण केलेली असावी.

४) औषधनिर्माता पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे एम फार्म,डी फार्म,बी फार्म इत्यादी झालेले असणे आवश्यक आहे.

५) प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे बीएससी डीएम एलटी सोबत झालेले असणे आवश्यक आहे.

६) एस टी एस ह्या पदासाठी कुठल्याही शाखेचा पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतो.पदवी सोबत उमेदवाराचे एम एस सीआयटी अणि टायपिंग झालेले असणे आवश्यक आहे.

मराठी ३० इंग्रजी ४० टायपिंग स्पीड असणे आवश्यक आहे

७) फील्ड माॅनिटर ह्या पदासाठी कुठल्याही शाखेचा पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतो.पदवी सोबत उमेदवाराचे एम एस सीआयटी अणि टायपिंग झालेले असणे आवश्यक आहे.

मराठी ३० इंग्रजी ४० टायपिंग स्पीड असणे आवश्यक आहे.

वेतन –

१) पुर्ण वेळ अधिकारी पदावर निवड झालेल्या उमेदवारांना साठ हजारांपर्यंत वेतन प्राप्त होणार आहे.

२) अर्धवेळ अधिकारी पदावर निवड झालेल्या उमेदवारांना तीस हजारांपर्यंत वेतन प्राप्त होणार आहे.

३) स्टाफ नर्स या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना २० हजार इतके वेतन प्राप्त होणार आहे.

४) औषध निर्माता पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १७ हजार इतके वेतन प्राप्त होणार आहे.

५) प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १७ हजार इतके वेतन प्राप्त होणार आहे.

६) एस टी एस अणि फिल्ड माॅनिटर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना २० हजार इतके वेतन प्राप्त होणार आहे.

See also  अकाऊंटंट बनण्यासाठी कोणता कोर्स,डिप्लोमा करायला हवा?Which course and diploma best for accounting jobs in Marathi