जनरल इन्शुरन्स काॅर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये चार्टर्ड अकाऊंट पदासाठी भरती सुरू – GIC CA recruitment 2023 in Marathi

जनरल इन्शुरन्स काॅर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये चार्टर्ड अकाऊंट पदासाठी भरती सुरू GIC CA recruitment 2023 in Marathi

 

जनरल इन्शुरन्स काॅर्पोरेशन ऑफइंडिया मुंबई यांच्या तर्फे चार्टर्ड अकाऊंट पदाच्या 12 रिक्त जागा भरण्यासाठी जाहीरात देण्यात आली आहे.

इच्छुक अणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आॅनलाईन पद्धतीने या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे.

ज्या उमेदवारांची निवड करण्यात येईल त्यांना मुंबई महाराष्ट्र येथे नोकरीची संधी प्राप्त होणार आहे.

भरती केल्या जात असलेल्या पदाचे नाव -चार्टड अकाऊंट

एकुण पदसंख्या -12

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

सर्व पात्र तसेच इच्छुक उमेदवारांनी 27 फेब्रुवारी 2023 पर्यंत आपला अर्ज आॅनलाईन पदधतीने सबमिट करायचा आहे.

शैक्षणिक पात्रतेची अट –

चार्टर्ड अकाऊंट पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराने कुठल्याही एका शाखेतुन पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

जनरल तसेच ओबीसी कॅटॅगरी मधील उमेदवारांनी कुठल्याही एका शाखेतुन 60 टक्के गुण मिळवून पदवी पास असणे आवश्यक आहे तर एस सी एस टी कॅटॅगरी मधील उमेदवारांनी किमान 55 टक्के गुण मिळवून कुठल्याही एका शाखेतुन पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

तसेच त्याने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ही अंतिम परीक्षा देखील पास असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा अट –

27 फेब्रुवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्ष

उमेदवाराचा 2-2 1993 च्या अगोदर जन्म झालेला असावा उमेदवाराचा जन्म १/२/२००२ नंतर झालेला नसावा.

वयातील सवलत –

सर्व एस सी एस टी कॅटॅगरी मधील उमेदवारांना पाच वर्षे इतकी सुट देण्यात आली आहे.अणि ओबीसी कॅटॅगरी मधील उमेदवारांना तीन वर्षे इतकी वयात सुट देण्यात आली आहे.

See also  Agriculture Infrastructure Fund Benefits under PM-KISAN

अपंगांना १० वर्ष इतकी सुट देण्यात आली आहे.

परीक्षा फी शुल्क –

चार्टर्ड अकाऊंट पदाच्या या भरतीसाठी कुठल्याही उमेदवाराकडुन कोणतेही परीक्षा शुल्क घेण्यात येणार नाहीये.

वेतन –

ज्या उमेदवारांची चार्टर्ड अकाऊंट पदासाठी निवड करण्यात येईल त्यांना 50 हजार 295 ते 96 हजार 795 इतके वेतन दिले जाणार आहे.

निवडप्रक्रिया –

सर्व पात्र उमेदवारांची अंतिम निवड प्राथमिक परिक्षा मेडिकल टेस्ट अणि मुलाखतीच्या आधारावर केली जाणार आहे.

अधिकृत संकेतस्थळ –

https://www.gicre.in/en/ ही जनरल इन्शुरन्स काॅर्पोरेशन आॅफ इंडियाची आॅफिशिअल वेबसाईट आहे.

आॅनलाईन अर्ज करण्याची लिंक –

https://www.icai.org/

व्हॅकॅन्सी रिझर्व्हेशन कॅटॅगरी प्रमाणे पुढीलप्रमाणे असणार आहे –

  1. जनरल – 6
  2. एससी 2
  3. एसटी 1
  4. ओबीसी -2
  5. ईडबलयुएस -1