केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात मेडिकल ऑफिसर पदाच्या २९७ जागांसाठी भरती सुरू – CAPF recruitment 2023 in Marathi

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात मेडिकल ऑफिसरपदाच्या २९७ जागांसाठी भरती सुरू CAPF recruitment 2023 in Marathi

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये मेडिकल ऑफिसरच्या विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सर्व इच्छुक अणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर सदर भरतीसाठी आपला आॅनलाईन पदधतीने अर्ज जमा करायचा आहे.

ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांना संपूर्ण भारतात कुठेही नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

CAPF recruitment भरती केल्या जात असलेल्या पदांचे नाव

१) सेंकड इन कमांड सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी

एकुण रिक्त जागा -५

२) स्पेशलिस्ट वैद्यकीय अधिकारी डेप्युटी कमांडंट

एकुण रिक्त जागा -१८५

३) वैद्यकीय अधिकारी असिस्टंट कमांडंट

एकुण रिक्त जागा -१०७

वरील सर्व जागा मिळुन एकुण २९७ जागांसाठी भरती केली जात आहे.

CAPF recruitmentअर्ज करण्याची सुरूवात –

सदर भरतीसाठी अर्ज करायला 15 फेब्रुवारी 2023 पासुन सुरूवात होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –

सर्व पात्र अणि इच्छुक उमेदवारांनी सदर भरतीसाठी १६ मार्च २०२३ पर्यंत आॅनलाईन पदधतीने अॅप्लाय करायचे आहे.

CAPF recruitment शैक्षणिक पात्रतेची अट –

१)सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी सेकंड इन कमांड –

या पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे एम बी बी एस झालेले असणे गरजेचे आहे. किंवा संबंधित विषयामध्ये डिप्लोमा किंवा पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

डीएम एम सी एच सोबत तीन वर्षांचा अनुभव असायला हवा.

See also  महिलांनी उन्हाळ्यात आपल्या चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची? - Summer Skin Care for women

२) स्पेशलिस्ट वैद्यकीय अधिकारी डेप्युटी कमांडंट-

या पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराने एम बी बी एस झालेले असणे आवश्यक आहे.किंवा त्याचा संबंधित विषयात डिप्लोमा किंवा पदवी झालेली असावी.+दीड ते अडीच वर्षे इतका अनुभव देखील असायला हवा.

३) वैद्यकीय अधिकारी असिस्टंट कमांडंट –

या पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराने मेडिसिनची अॅलोपॅथिक मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

रोटेटींग इंटर्नशिप घेत असताना अर्ज करण्यास पात्र असेल पण नियुक्ती अगोदर इंटर्नशिप करणे अनिवार्य असणार आहे.

वयोमर्यादा अट –

१६/३/२०२३ रोजी सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी सेकंड इन कमांड पदासाठी ५० वर्ष

१६/३/२०२३ रोजी स्पेशलिस्ट वैद्यकीय अधिकारी डेप्युटी कमांडंट पदासाठी ४० वर्ष

१६/३/२०२३ रोजी वैद्यकीय अधिकारी असिस्टंट कमांडंट पदासाठी ३० वर्ष

CAPF recruitment मुलाखतीची तारीख अणि वेळ –

आॅनलाईन अॅप्लीकेशन सबमिट करून झाल्यावर सर्व अर्ज करणारया उमेदवारांना ईमेल द्वारे किंवा मोबाईल नंबर वर टेक्स्ट मॅसेज करून ई अॅडमिट कार्ड दिले जाणार आहे.

यात कागदपत्रे चौकशी पडताळणीसाठी अणि मुलाखतीसाठी उमेदवारांना कधी अणि कोणत्या तारखेला किती वाजता यायचे आहे हे सर्व दिलेले असेल.

निवडप्रक्रिया –

सर्व पात्र अणि योग्य उमेदवारांची निवड ही डाॅक्युमेंट व्हेरीफिकेशन,शारीरिक मानक चाचणी,मुलाखत अणि मेडिकल टेस्ट ह्या आधारावर केली जाणार आहे.

अर्ज करण्याची फी –

जे उमेदवार ओबीसी तसेच ईडबलयुएस कॅटॅगरी मधील आहेत त्यांना अर्ज करण्यासाठी 400 रूपये इतकी फी भरावी लागणार आहे.

Ex sm महिला अणि जे उमेदवार एस सी एस टी कॅटॅगरी मधील आहेत त्यांना कुठलीही अर्ज फी भरावी लागणार नाहीये.

CAPF recruitment भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक –

https://recruitment.itbpolice.nic.in/

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची आॅफिशिअल वेबसाईट-

http://www.mha.gov.in/en/about-us/central-armed-police-forces

वेतन –

सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी सेकंड इन कमांड पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 78 हजार 800 ते 2,09 200 इतके वेतन तसेच इतर फायदे देखील दिले जाणार आहे.

See also  रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीला गिफ्ट देण्यासाठी 20 गिफ्ट आयडीया - Raksha Bandhan 20 Gift Ideas 2022 In Marathi

स्पेशलिस्ट वैद्यकीय अधिकारी डेप्युटी कमांडंट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 67 हजार 700 ते 2,09 700 इतके वेतन तसेच इतर फायदे देखील प्राप्त होणार आहे.

वैद्यकीय अधिकारी असिस्टंट कमांडंट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 56 हजार 100 रूपये ते 1,77,500 इतके वेतन तसेच इतर फायदे देखील प्राप्त होणार आहे.