विशेष विवाह कायदा १९५४ विषयी माहिती – Special marriage act 1954 information in Marathi

विशेष विवाह कायदा १९५४- special marriage act 1954 information in Marathi

विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत करण्यात आलेल्या महत्वाच्या तरतुदी –

विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत दोन वेगवेगळ्या धर्मातील,जातीतील तरुण किंवा तरूणीस एकमेकांसोबत लग्न करण्यासाठी विवाह नोंदणी करता येत असते.हा कायदा १ जानेवारी १९५५ पासुन लागु करण्यात आला होता.

अणि हा विवाह करण्यासाठी त्यांना आपली जात किंवा धर्म बदलण्याची देखील आवश्यकता नसते.

  1. विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत विवाह करण्यासाठी तरूण अणि तरूणीस एक फाॅम भरणे आवश्यक असते अणि हा भरलेला फाॅम रेजिस्ट्रार कडे जमा करावा लागत असतो.
  2. विवाह करण्याच्या ३० दिवस अगोदर तरूण अणि तरूणी दोघांना रेजिस्ट्रार कडे आम्ही विवाह करीत आहोत अशी एक कायदेशीर नोटीस पाठवणे आवश्यक असते.
  3. रेजिस्ट्रार कडे लग्नासाठी पाठविण्यात आलेल्या नोटीसवर ती प्रकाशित करण्यात आल्यानंतर कुठलाही आक्षेप घेण्यात आला नाही तर दोघे भिन्न जाती धर्मातील तरूण तरूणी यांना आपापसात विवाह करता येतो.
  4. विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत विवाह करण्यासाठी मुलाचे वय २१ अणि मुलीचे वय १८ पुर्ण असणे आवश्यक असते.
  5. विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत विवाह नोंदणी करण्यासाठी मुलगा तसेच मुलीचे याआधी लग्न झालेले नसणे आवश्यक आहे.मुलगा तसेच मुलगी या दोघांमध्ये कोणीही विवाहित आढळुन आले तर विवाह नोंदणी केली जात नसते.
  6. विवाह नोंदणी करत असलेल्या दोघांपैकी मुलगा किंवा मुलगी घटस्फोट झालेला असेल तर त्याबाबद कायदेशीर पुरावा विवाह नोंदणी अधिकारी यांच्या समोर सादर करणे आवश्यक आहे.
  7. तसेच विवाह करीत असलेले दोन्ही उमेदवार शारीरिक मानसिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे.म्हणजेच दोघांपैकी एकालाही कुठलाही असा मानसिक आजार नसावा ज्यामुळे त्यांना भविष्यात संतती उत्पती मध्ये समस्या निर्माण होईल.
  8. विवाह करत असलेला मुलगा किंवा मुलगी जर विदुर असेल तर त्यास आपल्या आधीच्या जोडीदाराचा मृत्युदाखला सादर करणे आवश्यक असते.
See also  चंद्रयान ३ च्या लॅडिंग करीता २३ आॅगस्ट हीच तारीख का निवडण्यात आली? Why was 23 August the date chosen for Chandrayaan 3's landing
Special marriage act 1954 information in Marathi

विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत विवाह नोंदणी कुठे केली जात असते?

आपापसात लग्न करू इच्छित असलेले मुलगा मुलगी ज्या जिल्ह्यात राहत असतील तेथील विवाह नोंदणी कार्यालयात ही नोंदणी त्यांना करता येत असते.

विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत विवाह नोंदणी प्रक्रिया –

सर्वप्रथम जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात मुलाला अणि मुलाला आंतरजातीय विवाहासाठी एक अर्ज करावा लागतो.हा अर्ज आपणास आॅनलाईन अणि आॅफलाईन दोन्ही पद्धतीने उपलब्ध होत असतो.

अर्जासोबत वराचे अणि वधुचे दोघांचे ओळखपत्र/रहिवासी तसेच जन्म दाखला ह्या कागदपत्रांची ओरिजनल झेरॉक्स जोडावी लागते.

वरवधुने आंतरजातीय विवाहासाठी अर्ज केल्यानंतर ३० दिवसांच्या कालावधीसाठी एक नोटीस लावली जाते या नोटीसवर ३० दिवसांत काही आक्षेप घेण्यात आला अणि हा आक्षेप वैध असेल तर विवाह नोंदणी केली जात नाही.विवाह नोंदणीसाठी केलेला अर्ज नामंजूर करण्यात येत असतो.

अणि समजा विवाह नोंदणी करीता अर्ज दाखल केल्यावर नोटीस लावल्यानंतर ३० दिवसाच्या आत त्यावर कुठलाही आक्षेप घेण्यात आला नाही तर नोटीस कालावधी संपल्यानंतर पुढील ९० दिवसांत विवाह नोंदणी करण्यासाठी मुदत देण्यात येत असते.

म्हणजे नोटीस कालावधी संपल्यानंतर पुढील ९० दिवसांत कधीही विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन आपण विवाह नोंदणी करू शकतो.

विवाह नोंदणी करण्यासाठी वर अणि वधु यांना तीन साक्षीदारांसह विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन विवाह नोंदणी करता येत असते.

पण ज्या तीन साक्षीदारांसह विवाह नोंदणी केली जात आहे त्यांचे २१ वर्षे पुर्ण असणे आवश्यक असते अणि त्यांच्याकडे त्यांचा रहिवासी पुरावा अणि ओळखपत्र असणे गरजेचे असते.

विवाह नोंदणीसाठी केला जाणारा आक्षेप कशा पदधतीचा असु शकतो?

म्हणजे विवाह करत असलेल्या मुलाचे वय २१ नसेल किंवा मुलीचे वय १८ पुर्ण नसेल तर आपणास त्यांच्या विवाहाला आक्षेप करता येत असतो.

विवाह करत असलेल्या मुलाचे मुलीचे याआधी लग्न झालेले आहे अणि त्याचा जोडीदार हयात आहे असे कारण असेल तेव्हा एखाद्या व्यक्तीला ह्या विवाह नोंदणीवर आक्षेप घेता येत असतो.

See also  महाराष्ट्रात येत्या चार पाच दिवसांत ह्या ठिकाणी अवकाळी पावसाची दाट शक्यता Maharashtra Rain Update In Marathi

विवाह नोंदणी करत असताना अशी हरकत घेण्यात आली तर मुलामुलीला कळविण्यात येते अणि ही हरकत दुर करण्यासाठी याबाबद योग्य ते स्पष्टीकरण प्राप्त करण्यासाठी चौकशी केली जाते.

विवाह नोंदणीसाठी केला जाणारा आक्षेप कशा कुठल्या पदधतीचा नसावा?

विवाह नोंदणी कायदा १९५४ अंतर्गत केल्या जात असलेल्या विवाह नोंदणी वर कुठल्याही व्यक्तीला ह्या कारणासाठी आक्षेप नाही घेता येणार की सदर मुलामुलीच्या कुटुंबाचा ह्या आंतरजातीय लग्नाला विरोध तसेच नकार आहे.किंवा कुटुंबाची संमती नाहीये.

विशेष विवाह कायदा विषयीं जाणुन घ्यायच्या इतर महत्त्वाच्या बाबी-

एखाद्या व्यक्तीने एक विवाह झालेला असताना देखील ह्या कायदया अंतर्गत दुसरा विवाह केला तर त्याचा विवाह अमान्य घोषित केला जाईल तसेच त्याच्यावर भारतीय दंड संहिता सेक्शन ४९४ अणि ४९५ अंतर्गत कारवाई देखील केली जाऊ शकते.

हिंदु विवाह कायदा प्रमाणेच यात विवाहास अमान्यता दिली जाऊ शकते.यात ज्युडिशिअल सेपरेशन तसेच घटस्फोटाच्या तरतुदी हिंदु विवाह कायदया प्रमाणेच आहेत.

विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत अशी देखील तरतूद करण्यात आली आहे की मुलगा किंवा मुलगीस काही निषिद्ध नातेसंबंधात लग्न करता येत नाही.यालाच degree of prohibited relationship असे देखील म्हटले जाते.

निषिद्ध नाते संबंध म्हणजे मुलीला आपल्या भावाशी लग्न करता येत नसणे किंवा भावाला आपल्या नात्यातील बहिणीशी लग्न न करता येणे.