दहावी बारावी निकालाची संभाव्य तारीख घोषित – SSC and HSC exam result date latest update in Marathi

ज्या उमेदवारांनी दहावी अणि बारावीची परीक्षा दिली आहे अणि ते आपल्या निकालाची उत्सुकतेने वाट पाहत आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.

दहावी तसेच बारावी परीक्षेच्या निकालाची संभाव्य तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

ह्या संभाव्य तारखेनुसार दहावीचा निकाल हा १० जुन पर्यंत लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अणि बारावीचा निकाल हा जुन महिन्यात पहिल्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या अखेरीस एंडिगला देखील लागु शकतो असे सांगितले जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की राज्य मंडळाच्या वतीने दहावी अणि बारावी मधील विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसार घेतल्या होत्या.

पण आपल्या काही प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी त्या सर्व मागण्यांची पुर्तता शासनाकडुन करण्यासाठी बारावीच्या परीक्षेच्या उत्तर पत्रिका न तपासायचे महाराष्ट्र राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी ठरवले होते.

ज्यामुळे आपल्या मागण्या पुर्ण करण्यासाठी केलेल्या हया संपामध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक तब्बल आठ दिवस संपावर गेले होते.

यानंतर जुन्या पेंशनच्या मागणीसाठी देखील सात ते आठ दिवस शिक्षकांकडून संप पुकारण्यात आला होता त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका वेळेवर तपासल्या गेल्या नाहीत.

यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या मनात आपले निकाल वेळेवर लागणयाबाबद शंका होती.पण नुकत्याच हाती आलेल्या अपडेट मध्ये दहावी अणि बारावी यांचा निकाल कधी लागणार याची संभाव्य तारीख घोषित करण्यात आली आहे.

म्हणजे ठरलेल्या वेळेतच विद्यार्थ्यांना आपले निकाल प्राप्त होणार आहे हे ह्या वरून सिदध झाले आहे.

जेणेकरून पुढचे शैक्षणिक वर्ष सत्र सुरू होण्यास कुठल्याही प्रकारचा विलंब होणार नाहीये.अणि विद्यार्थ्यांचे कुठलेही शैक्षणिक नुकसान देखील होणार नाहीये.

See also  वाइस एडमिरल संजय जसजीत सिंह नौदलाचे नवे उप-प्रमुख