मणिपूर मधील हिंसेचे जाळपोळीचे मुख्य कारण काय आहे?Manipur violence reasons in Marathi

मणिपूरमध्ये मधील हिंसेचे जाळपोळीचे मुख्य कारण ?Manipur violence reasons in Marathi

मणिपूर मध्ये हिंसाचार ग्रस्त भागात शांतता भंग करताना दिसुन येतील किंवा कुठल्याही प्रकारची हिंसा करताना दिसुन येतील अशा व्यक्तींना बघताच गोळी घालण्याचे आदेश सैन्याला देण्यात आला आहे.

मणिपूर येथे झालेल्या आंदोलना दरम्यान हिंसा जाळपोळीचा जो प्रकार घडुन आला होता.याला आळा घालण्यासाठी नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे.

ह्या आदेशासाठी राज्य पालांकडुन मंजुरी देखील देण्यात आली आहे.

मणिपूर राज्यातील वाढत असलेली हिंसा बघता सर्व हिंसाचार ग्रस्त भागात याकरीता विशेष करून लष्कर अणि आसाम रायफल्सच्या जवानांना सुरक्षेसाठी तैनात देखील करण्यात आले आहे.

सध्या मणिपूर मधील जवळपास चार हजार लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचवले जात आहे.येथील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पाच दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.अणि सुमारे आठ जिल्ह्यांत संचारबंदीचा आदेश सुद्धा लागु करण्यात आला आहे.

मणिपूर येथे हिंसा तसेच जाळपोळ का केली जात आहे?

मनिपुर राज्यात ईशान्येकडे हिंसाचाराची लाट उसळल्याने मणिपुर राज्यातील बिगर आदिवासी आठ जिल्ह्यांत शासनाने संचारबंदी केली आहे.

  1. मणिपूर राज्याच्या ५३ टक्के इतकी लोकसंख्या असलेल्या मेतई जमातीच्या लोकांना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यावरून हा वाद हिंसाचार घडुन आला आहे.
  2. मणिपूर उच्च न्यायालयाने १९ एप्रिल रोजी एक फैसला सुनावला होता.ज्यात मैतई समाजाला अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ट करण्यात आले होते.पण मणिपूर उच्च न्यायालयाच्या ह्या निर्णयाला नागा अणि कुकी समुदायातील लोकांनी आपला विरोध दर्शवला आहे.
  3. मणिपूर उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचा आक्षेप करण्यासाठी आॅल ट्रायबल स्टुडंट् युनियन कडुन एक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.मोठया प्रमाणात युवकांचा सहभाग असलेले हे आंदोलन विष्णू नगर चुराचांद पुर येथे आयोजित करण्यात आले होते.
  4. पण आंदोलन करत असताना विष्णू नगर जिल्ह्यातील नागरिकांसोबत मोर्चे करयांचा वादविवाद झाला.हया वादाने भयंकर हिंसेचे रूप धारण केले ज्यात येथील मैतई अणि नागा कुकी समुदायातील लोकांनी एकमेकांची घरे जाळली.
  5. एकमेकांच्या घरांची तोडफोड देखील केली यात आजुबाजुला असलेल्या इतर घर दुकानांची मंदिरांची प्रार्थना स्थळांची देखील तोडफोड करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.
See also  चालु घडामोडी मराठी - 18 मे 2022 Current affairs in Marathi

यानंतर हे हिंसेचे पडसाद राज्यभर पसरल्याने वातावरण अधिक तापले ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हिंसा अधिक वाढु नये कुठलीही जिवितहानी होऊ नये म्हणून

सुरक्षेसाठी लष्कराच्या जवानांना तसेच आसाम रायफल्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते.हिंसाचार ग्रस्त भागात राहत असलेल्या नागरीकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याची व्यवस्था शासनाकडुन केली जात आहे.

सुमारे सात हजार नागरीकांनी लष्करी छावण्या शासकीय कार्यालयांमध्ये सुरक्षेसाठी आश्रय देखील घेतला आहे.

मैतई नागा अणि कुकी समाजाकडुन केल्या जात असलेल्या मागण्या कोणकोणत्या आहेत?

मैतई समाजाच्या मागण्या –

  1. मणिपूर राज्यातील मैतई समाजातील लोकांची अशी मागणी आहे की इंफाळ खोरयात मैतई समुदायातील लोकांची संख्या अधिक आहे.
  2. बांगलादेश तसेच म्यामनार मधील लोकांची घुसखोरी वाढत असल्याने मैतई समुदायातील लोकांना अनेक समस्या अडीअडचणींना संकटांना सामोरे जावे लागत आहे.
  3. अणि नागा अणि कुकी समुदायातील लोकांचा याबाबतीत विचार करावयास गेले तर टेकड्याच्या भागात असलेल्या नागा अणि कुकी समुदायातील लोकांना अशी कुठलीही समस्या नाही कारण त्यांना विविध कायद्यांदवारे याबाबत संरक्षण प्रदान करण्यात आले आहे.म्हणुन त्यांच्या जमीनीवर अतिक्रमण होण्याची कुठलीही भीती नाही.
  4. मणिपूर राज्यामधील ९० टक्के इतका भाग टेकडींचा आहे.म्हणजेच मैतई समुदायातील लोकांनी बाहेरच्या लोकांकडून त्यांच्या वाडवडिलांपासुनच्या वडिलोपार्जित जमिनी बळकावल्या जात असल्याचा दावा केला आहे म्हणून यापासून संरक्षण प्राप्त होण्यासाठी मैतई समाजाला अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी मैतई समुदायातील लोकांकडून केली जात आहे.
  5. सध्याच्या कायद्या मधील तरतुदीमुळे मैतई समाजातील लोकांना टेकडी भागात कायमस्वरूपी वास्तव्य करता येत नाहीये.
  6. मैतई समुदायातील लोकांच्या ह्याच मागणींच्या पुर्ततेसाठी शेड्युल ट्राईब डिमांड कमिटीकडुन आंदोलन केले जात आहे
  7. हे आंदोलन केवळ नोकरीमध्ये आरक्षण मिळविण्यासाठी नव्हे तर आपल्या वडिलोपार्जित जमिनीचे पिढयान पिढ्याच्या जपल्या जात असलेल्या संस्कृतीचे परंपरेचे भाषेचे संरक्षण करण्यासाठी मैतई समुदायातील लोकांकडून हे आंदोलन केले जात आहे.
See also  चालु घडामोडी मराठी 4 मे २०२३- Current Affairs in Marathi

नागा अणि कुकी समुदायातील लोकांकडुन मैतई समुदायातील लोकांच्या मागणीला विरोध का केला जातो आहे?

नागा अणि कुकी समुदायातील लोकांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले आहे की जर मैतई समुदायातील लोकांना अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ट करण्यात आले तर त्यांच्या अधिकारांवर गदा येण्याची दाट शक्यता आहे.

  • वनातील जमीन घुसखोरांपासुन मुक्त करण्यात यावी यासाठी राज्यातील मुख्यमंत्री यांनी आदेश जारी केला होता.पण हा आदेश जारी केल्यानंतर कारवाई करताना राज्याच्या वन्यजीव खात्याकडून काही कुकिंना संरक्षण भागात असताना देखील बाहेर काढण्यात आले होते.हे एक शासनाविषयी असंतोषाचे विरोधाचे महत्वाचे कारण आहे
  • याचसोबत वन जमिनीबाबत जो आदेश शासनाकडुन जारी करण्यात आला होता त्यात अतिक्रमण असा उल्लेख केला गेला आहे.अधिसुचनेत अतिक्रमण हा शब्द वापरण्यात आल्याने शासन कधीही कुठल्याही प्रकारची नोटीस जारी न करता देखील येथील नागा अणि कुकी समुदायातील लोकांच्या जमिनी आपल्या ताब्यात घेऊ शकते.

असे येथील नागा अणि कुकी समुदायातील लोकांनी म्हटले आहे.म्हणुन नागा अणि कुकी समुदायातील लोकांकडुन मैतई समुदायातील लोकांच्या मागणी विरूद्ध विरोध दर्शविण्यासाठी आंदोलन केले जात आहे.

येथील मुख्य मंत्र्यांनी एन बिरेन सिंग यांनी सर्व जनतेस शांतता अणि सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे.हया आंदोलनाला प्राप्त झालेल्या हिंसक वळणामुळे कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.मणिपुर राज्यातील अनेक नागरीकांचे आर्थिक नुकसान देखील झाले आहे.

मणिपूर राज्याचा थोडक्यात परिचय –

  • मणिपूर हे आपल्या भारत देशाच्या ईशान्य भागात असलेले एक राज्य आहे.मणिपुरची राजधानी इंफाळ ही आहे.
  • मणिपूर राज्याच्या उत्तरेस नागालॅड,पश्चिमेस आसाम दक्षिणेस मिझोराम अणि पुर्वेला म्यामनार हा देश आहे.मनिपुरचे एकुण क्षेत्रफळ हे बावीस हजार तीनशे सत्तावीस चौरस मीटर इतके आहे.
  • मणिपूर राज्याची लोकसंख्या २७,२१,७५५ इतकी आहे.येथील‌ प्रमुख भाषा मणिपुरी ही आहे.मणिपुरची साक्षरता ७९.८५ टक्के इतकी आहे.उस मोहरी तांदूळ ही येथील प्रमुख पिकांची नावे आहेत.
  • मिझोरम राज्याची स्थापना २१ जानेवारी १९७२ रोजी झाली होती.मनीपुर राज्यात एकूण सोळा जिल्हे आहेत.
  • मणिपूर राज्याच्या लोकसंख्या मध्ये मणिपुरी लोकांचा समावेश ५३ टक्के इतका आहे.यात कुकी झो जमातीची लोकसंख्या १६ टक्के अणि नागा जमातीची लोकसंख्या २४ टक्के इतकी आहे.
  • येथील आदिवासी लोकांची संख्या राज्यातील लोकसंख्येच्या जवळजवळ ४१ टक्के असल्याचे सांगितले जाते.मणिपुर येथील लोकसंख्या मध्ये ५३ टक्के इतकी लोकसंख्या मैतई ह्या समुदायातील लोकांची आहे.इंफाळ मध्ये ह्या मेतई समुदायाची संख्या अधिक असल्याचे सांगितले जाते.
See also  यूएस डेट-सीलिंग क्राइसिस क्या है?