Anxiety म्हणजे काय? Anxiety meaning in Marathi

Anxiety  का होते  ? Anxiety meaning in Marathi

 रोजच्या धावपळीच्या,महागाईने भरलेल्या ह्या जीवणात आपल्या प्रत्येकाला पैसे कमविण्याची चिंता असते.कारण आपण पैसे कमवू तरच आपले घर चालणार असते. फक्त पैसाच नव्हे तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी चिंता तसेच ताणतणाव असतो.

मनात कसली तरी सतत चिंता,विचार चाललेले असतात.आणि मग जेव्हा आपण प्रमाणापेक्षा अधिक एखाद्या बाबतीत चिंता करू लागतो तेव्हा आपल्याला anxiety ची गंभीर समस्या देखील निर्माण होत असते.

Anxiety ही एक अशी स्टेट असते ज्यात एखादी व्यक्ती खुप चिंतित आणि भयभीत होऊन जात असते.आणि चिंतेत त्याच्या हदयाचे ठोके देखील अचानक वाढुन जात असतात.

आजच्या लेखात आपण हेच जाणुन घेणार आहोत की anxiety म्हणजे नेमकी काय असते?त्याची कारणे कोणकोणती असतात

एखाद्या व्यक्तीला तसेच आपल्याला anxiety चा problem आहे हे आपणास कसे काय कळु शकते?आणि मग त्यावर आपण काय उपचार करू शकतो?

Anxiety म्हणजे काय? meaning in Marathi

  Anxiety हा चिंतेशी संबंधित एक मानसिक आजार असतो.जेव्हा आपण चिंता आणि भीतीच्या वातावरणात असतो तेव्हा नक्की काहीतरी वाईट होणार आहे अशी चिंता आपल्याला भेडसावत,सतावत असते.

चिंता करणे ही मानवी स्वभावाचाच एक भाग आहे आपल्या घरातील एखादी व्यक्ती संध्याकाळी लवकर घरी न आल्यावर घरच्यांना देखील लगेच त्याची थोडी का होईना चिंता होत असते.की तो अजुन का आला नाही?तो कुठे राहिला असेल त्याला आज एवढा उशीर का झाला असे प्रश्न चिंतेत पडत असतात.

आपल्या जवळच्या व्यक्तीची काळजी करणे चिंता करणे आपल्या मुलामुलीच्या पुढच्या भवितव्याची चिंता करणे की त्याचे पुढे जाऊन कसे होणार?त्याला चांगली नोकरी भेटणार की नाही ही एक साहजिकच गोष्ट आहे.

See also  नोरो व्हायरस विषयी माहीती - Norovirus information in Marathi

पण जेव्हा हिच चिंता अधिक प्रमाणात वाढतच जाते तेव्हा याचा परिणाम आपल्या कौटुंबिक,आर्थिक तसेच सामाजिक जीवनावर देखील होत असतो.

आणि मग हिच चिंता एक मोठया anxiety अटँकचे रूप धारण करायला वेळ देखील लागत नाही.

Anxiety चे कारण काय असते?

Anxiety चे कोणतेही एक विशिष्ट कारण आपण सांगु शकत नाही.कारण प्रत्येक व्यक्तीच्या anxiety मागे अलग अलग कारणे असतात.

जसे की कोणाला आपल्या करिअरची भविष्याची चिंता असते,चारचौघात आपले हसु होण्याची भीती,अपयशी होण्याची भीती,नोकरी जाण्याची भीती अशी विविध कारणे anxiety attack साठी कारणीभुत ठरतात.

Anxiety ची काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

1)भुतकाळातील जुने आणि त्रास देणारे घटना,प्रसंग :

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात भुतकाळात काही असे घटना प्रसंग घडुन आलेले असतात.ज्यांची नुसती आठवण केली तरी आपण चिड चिड करायला लागतो.आणि तो व्यक्ती माझ्यासोबत असे चुकीचे का वागला?त्याने माझ्यासोबत असे का केले असा विचार करून आपण स्वताला त्रास करून घेत असतो.

यात आपल्या आयूष्यात आपल्यासोबत घडलेली एखादी वाईट दुर्घटना,एखाद्याने आपला तोडलेला विश्वास,प्रेमात मिळालेला धोका अशी अनेक कारणे समाविष्ट होत असतात. 

2) आर्थिक परिस्थिती :

 आपल्या प्रत्येकाला कसले ना कसले टेंशन असते.मग ती घरची आर्थिक परिस्थिती असो किंवा पैशांची सतत भासत राहणारी चणचण असो.बँकेकडुन तसेच इतर कोणाकडुन घेतलेले कर्ज वेळेवर फेडता न येणे हे देखील आपल्या anxiety चे कारण असु शकते.

3) मनातील नैराश्याची भावना :

 आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गतकाळात काही असे घटना प्रसंग घडलेले असतात ज्यामुळे आपल्या मनात जीवनाविषयी नकारात्मक आणि नैराश्याची भावना निर्माण होत असते.

ज्यामुळे आपल्याला कधी कधी असे वाटते की आयुष्यात करण्यालायक आता काही उरलेच नाहीये.

याचसोबत आपल्या आजुबाजुचे व्यक्ती खुप प्रगती करता आहे आणि आपण अजुनही आहे तिथेच आहे हे पाहुन आपले दिवस कधी बदलणार आपले चांगले क्षण कधी येणार याचाच आपण सतत विचार करतो आणि चिंतेत राहत असतो.याने देखील anxiety चे प्रमाण वाढत असते.

See also  गूगल ले ऑफ म्हणजे काय?Google layoff meaning in Marathi

 

Anxiety ची लक्षणे :

 Anxiety ची काही पुढील लक्षणे असु शकतात:

1)सतत विचार आणि चिंता करणे :

Anxiety problem असलेला व्यक्ती हा नेहमी सतत चिंतेत राहत असतो.छोटछोटया कारणांवरून खुप जास्त चिंता करत असतो.

2) एकाग्रता कमी होणे :

 Anxiety चा problem असलेल्या व्यक्तीचे नेहमी वाचन करताना तसेच कुठलेही कार्य करताना चित्त एकाग्र होत नसते.

3) सतत कशाचीही भीती वाटते अस्वस्थ जाणवते:

 Anxiety चा problem असलेल्या व्यक्तीला कोणतेही कार्य करायला भय वाटते.आणि अशी व्यक्ती नेहमी अस्वस्थ राहत असते.

4) मनात नकारात्मक विचारांची वर्दळ सुरू असणे:

Anxiety चा problem असलेल्या व्यक्तीच्या मनात नेहमी कोणत्याही बाबतीत नकारात्मक विचार येत असतात.आणि हे विचार येणे थांबतच नसते.

 

Anxiety वर करावयाचे उपचार :

 

1)सायकोथेरपीची मदत घेणे :

 

आपल्याला जर आपली anxiety दुर करायची असेल तर सायकोथेरपीची मदत घ्यायला हवी.यात आपण मनातील कुठलीही भय चिंता दुर कशी करायची आपल्या मनावर कंट्रोल कसा मिळवायचा याची ट्रेनिंग आपणास दिली जाते.

2) anxiety च्या पेशंटला एकटे सोडणे टाळावे :

 Anxiety चा problem असलेल्या व्यक्तीला आपण कधीही एकटे सोडुच नये.त्याच्यासोबत कोणीतरी गप्पा मारण्यासाठी त्याचे मनोरंजन करून माईंड डाईव्हर्ट करण्यासाठी कोणीतरी त्याच्या सोबत असणे गरजेचे असते.

 

3) पोषक आहाराचे सेवन करायला हवे :

 Anxiety चा problem असलेल्या व्यक्तीला आपण हिरवा भाजीपाला,फळे तसेच सकस आहारा द्यायला हवा.त्याला बाहेरचे स्टाँलवरचे तळलेले पदार्थ खाण्यासाठी देऊ नये.

 

4) रोज सकाळी व्यायाम योगा करणे :

 Anxiety चा problem असलेल्या व्यक्तीने रोज सकाळी मोकळया आणि शुदध हवेत फिरायला जावे व्यायाम करायला हवा.मेडीटेशन करायला हवे.

 

5) सुमधुर संगीताचा आनंद घेणे :

 Anxiety चा problem असलेल्या व्यक्तीने आपली चिंता दुर करण्यासाठी एखादे सुमधुर शास्त्रीय संगीत ऐकायला हवे.याने आपले मन पुन्हा प्रफुल्लित होऊन उठते आणि सुमधुर संगीत ऐकून एकदम शांत होऊन जाते.

See also  जगातील सर्वात महाग चलन कोणते आहे तुम्हाला माहित आहे का ?

Vibes म्हणजे काय? Vibes Meaning In Marathi

1 thought on “Anxiety म्हणजे काय? Anxiety meaning in Marathi”

Comments are closed.