पंतप्रधान आणि राष्टपती या दोघांमध्ये काय फरक आहे? – Difference Between Prime Minister and President

पंतप्रधान आणि राष्टपती  माहिती – Difference Between Prime Minister and President

जगभरात अनेक जागतिक नेते अनेक पदव्या ग्रहण करीत असतात.ज्यात प्रिमियर,चान्सेलर इत्यादी मोठमोठया पदांचा समावेश होत असतो.

पण ज्या दोन पदव्या अधिक प्रमाणात वापरल्या जातात त्या म्हणजे राष्टपती आणि पंतप्रधान.कारण ह्या दोन प्रमुख पदव्या आहेत.राष्टपती आणि पंतप्रधान या दोघे भुमिका तसेच जबाबदारी ह्या देशाच्या अधिन असतात.

भारतामधील शासन पदधत ही संसदीय स्वरूपाची असल्याने इथे राष्टपती आणि पंतप्रधान दोघे पद हे अस्तित्वात असलेले आपणास दिसुन येतात.

पण बहुतेक जणांना राष्टपती आणि पंतप्रधान या दोघांमध्ये काय अंतर आहे हे माहीत नसते.

म्हणजेच राष्टपतीची भुमिका काय असते?त्याची जबाबदारी काय असते?त्याच्याकडे असलेली पाँवर तसेच पंतप्रधानाची भुमिका,जबाबदारी,पा़ँवर या दोघांमधला फरक आपणास अजिबात माहीत नसतो.

 

म्हणुन आजच्या लेखात आपण राष्टपती आणि पंतप्रधान या दोघांमध्ये कोणता फरक आहे हे तुलनात्मक पदधतीने जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.जेणेकरून आपल्या मनात कुठलाही भ्रम राहणार नाही.

पंतप्रधान आणि राष्टपती या दोघांमध्ये कोणते फरक आहे? Difference Between Prime Minister and President

राष्टपती आणि पंतप्रधान दोघे पद राष्टीय स्तरावरची पदे आहेत.आणि ही पदे प्रत्येकाला दिली जात नसतात.म्हणजेच भारतात एकच राष्टपती आणि एकच पंतप्रधानाची निवड केली जाते.

आणि हे दोघे जो निर्णय घेत असतात तो निर्णय संपुर्ण देशात लागु केला जात असतो.म्हणजेच पंतप्रधान आणि राष्टपती या दोघांकडे संपुर्ण देशाच्या हिताच्या बाबतीत मोठेमोठे महत्वपुर्ण निर्णय घेण्याचा अधिकार असतो.

उदा.जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात नोटबंदीचा निर्णय घेतला होता तेव्हा त्यांच्या ह्या निर्णयाचे पालन संपुर्ण भारतातील नागरीकांना करावे लागले होते.यावरून आपणास कळुन येते की देशाच्या हितासाठी मोठे मोठे निर्णायक निर्णय घेण्याचा अधिकार पंतप्रधान आणि राष्टपती या दोघांकडे असतो.

See also  यशस्वी लोक नेमक वेगळ‌ काय करतात? जगातील १० यशस्वी, असामान्य ,अतुलनीय लोकांची कथा - Things Successful People Do Differently

पण पंतप्रधान आणि राष्टपती या दोघांकडे समान अधिकार असली तरी दोघांच्या भुमिका,जबाबदारी,अधिकार मध्ये काही अंतर आहे जे आपल्याला प्रत्येकाला भारताचा सुजाण नागरीक ह्या नात्याने माहीत असणे फार गरजेचे आहे.

रामनाथ कोविंद हे भारताचे सध्याचे राष्टपती आहेत आणि नरेंद्र मोदी हे भारताचे सध्याचे पंतप्रधान आहेत

Difference Between Prime Minister and President

रष्टपती

  1. राष्टपती हा देशाचा पहिला नागरीक असतो.
  2. राष्टपती हे पद हे भारतीय राज्यघटनेतील सर्वोच्च मानाचे पद म्हणून ओळखले जाते.
  3. राष्टपती हा व्यवस्थेचा प्रमुख असतो याचसोबत तो भारतीय सैन्यदलाचा लष्करप्रमुख म्हणजे(commander in Chief असतो.
  4. भारताचे पहिले राष्टपती हे डाँ राजेंद्र प्रसाद हे होते.आणि सध्याचे राष्टपती रामनाथ कोविंद हे आहेत.
  5. राष्टपतीचा कार्यकाल हा एकुण पाच वर्षाचा असतो.पण आपल्या कार्यकालाची मुदत संपण्याआधी देखील राष्टपती आपला राजीनामा उपराष्टपतीकडे सोपवू शकतात.
  6. भारताच्या राष्टपतींची निवड नागरीक करत नसतात तर संसद भवनामधील लोकसभा,राज्यसभा देशातील सर्व घटक राज्यांमधील विधानमंडळाचे विधानसभा ह्या शाखेतील निर्वाचित प्रतिनिधी करीत असतात.
  7. नवी दिल्लीत असलेले राष्टपतीभवन हे राष्टपतींचे मुख्य निवासस्थान आहे. ज्याने वयाची 35 वर्षे पुर्ण केलेली आहे असा लोकसभेचा सभासद म्हणुन निवडुन येण्याची पात्रता असलेला कुठल्याही भारताच्या नागरीकाला राष्टपतीपदासाठी उभे राहता येत असते.
  8. संसदेमधील प्रत्येक कायदा हा राष्टपतींच्या स्वाक्षरीनंतर तयार केला जात असतो.
  9. भारताच्या लोकशाही पदधतीत दुहेरी शासन व्यवस्था असलेली आपणास दिसुन
  10. येकेंद्राचा कारभार संसदेमार्फत चालतो तर घटक राज्याचा संपुर्ण कारभार राज्य विधी मंडळ मार्फत चालविला जातो.आणि ह्या दोघा प्रकारच्या राजकीय सत्तांवर नित्रंत्रण ठेवण्याचे काम राष्टपती करत असतो.
  11. राष्टपतीचे पद हे खुप मोठया जबाबदारीचे पद असते कारण राष्टपतीला अनेक संविधानिक विशेषाधिकार प्रदान करण्यात आले आहेत.
  12. एक व्यक्ती कमीत कमी दोनदा राष्टपतीपदासाठी निवडणुक लढु शकते.
  13. राष्टपतीने जर कुठल्याही प्रकारे घटनेचा भंग केला किंवा घटनेच्या विरोधात जाऊन एखादे कृत्य केले आणि राष्टपतीवर संसदेत महाभियोगाचा खटला लागु केला गेला आणि तो सिदध देखील झाला तर राष्टपतीला आपले पद सोडावे लागत असते.
  14. राष्टपतीला दर महिन्याला 1,50,000 इतके वेतन प्राप्त होत असते.
See also  लोकमान्य टिळक प्रेरणादायी कोटस अणि विचार,पुण्यतिथी अभिवादन- Lokmanya Tilak thought and quotes in Marathi

पंतप्रधान

  1. पंतप्रधान हा राजकीय नेता असतो.याचसोबत शासनाच्या कार्यकारीणी शाखेचे संचालन देखील पंतप्रधान करतो.राष्टपतींचा प्रमुख सल्लागार देखील असतो.
  2. पंतप्रधानाला देशातील सर्वात शक्ती शाली व्यक्ती म्हणुन ओळखले जाते.
  3. पंतप्रधान हा मंत्रिमंडळातील प्रमुख असतो.पंतप्रधान संसदेचा सभासद देखील असतो.
  4. भारताचे पहिले पंतप्रधान डाँ पंडित जवाहरलाल नेहरू हे होते.आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत.
  5. पंतप्रधानाचा एकुण कार्यकाल निश्चित नसतो.कारण पंतप्रधान आपले पद राष्टपतींची मर्जी असेपर्यत धारण करू शकतो.पण याचा अर्थ असा देखील होत नसतो की राष्टपती कधीही पंतप्रधानाला पदावरून काढुन टाकु शकतो.जोपर्यत पंतप्रधानाला लोकसभेत बहूमत प्राप्त होत असते तोपर्यत राष्टपती पंतप्रधानाला त्याच्या पदावरून काढु शकत नसतो.
  6. प्रत्येक देशात विविध पदधतीने पंतप्रधानाची निवड केली जात असते.पण सहसा कोणाचीही ह्या पदासाठी थेट निवड केली जात नाही.देशातील मतदार लोकप्रतिनिधींची निवड करत असतात आणि मग हे निवडुन आलेले प्रतिनिधी पंतप्रधान पदासाठी अंतर्गत निवडणूक करीत असतात.
  7. पंतप्रधान निवासस्थान – लोकराज्य
  8. पंतप्रधान बनत असलेली व्यक्ती संसदेच्या लोकसभा किंवा राज्यसभा या दोघांपैकी एका मधील सभासद असणे बंधनकारक मानले जाते.
  9. सरकार स्थापित करणे,मंत्रिमंडळाची निर्मिती करणे,मंत्र्यांची पदे नियुक्त करणे इत्यादी महत्वपुर्ण अधिकार पंतप्रधानाकडे असतात.
  10. भारतामध्ये सर्वसाधारणपणे पाच वर्षानी लोकसभेची निवडणुक असते.ह्या निवडणुकीत लोकसभेमध्ये सगळयात जास्त जागा प्राप्त करत असलेल्या राजकील पक्षाला राष्टपतींकडुन सरकार स्थापित करण्याचे आमंत्रण दिले जाते.मग त्या राजकीय पक्षामधील प्रमुख नेत्याला पक्षाकडुन पंतप्रधान म्हणुन निवडुन दिले जात असतात.
  11. पंतप्रधान बनण्यासाठी व्यक्ती लोकसभा तसेच राज्यसभेचा खासदार असणे गरजेचे आहे आणि लोकसभेचा सभासद असल्यास त्या व्यक्तीचे वय कमीत कमी 25 असावे लागते तर याचठिकाणी तो राज्यसभेचा सदस्य असेल तर त्याचे वय 30 असणे गरजेचे आहे.
  12. पंतप्रधानाचे वेतन हे संसद ठरवत असते.आणि त्यात वेळोवेळी बदल देखील घडवून आणत असते.

 

भारतातील 20 बेस्ट युटयुबर्स – List of India’s Best

See also  Regret म्हणजे काय?. Regret meaning in Marathi

Comments are closed.