इलाॅन मस्कने बदलला टविटरचा लोगो – Elon Musk changed Twitter logo

इलाॅन मस्कने बदलला टविटरचा लोगो Elon Musk changed Twitter logo

इलाॅन मस्क याने नुकताच टविटरचा जुना लोगो बदलुन त्याजागी एक नवीन लोगो सेट केला आहे.

आधी ट्विटरच्या लोगोवर आपणास निळया रंगाच्या पक्षीचे चित्र दिसुन येत होते पण आता इलाॅन मस्क याने हा लोगो बदलुन नवीन लोगो सेट केल्याने ट्विटरच्या लोगोवर आपणास निळ्या पक्ष्याच्या जागी कुत्र्याचे चित्र दिसुन येत आहे.

असे सांगितले जात आहे जेव्हापासुन टेस्लाचा संस्थापक इलाॅन मस्क याने टविटरचा ताबा त्याच्या हातात घेतला आहे तेव्हापासून वेगवेगळ्या प्रकारचे बदल ट्विटरच्या प्लॅटफॉर्म वर पाहावयास मिळत आहे.

इलाॅन मस्क याने नुकतेच आपल्या ट्विटर अकाऊंट वरून एक टविट केले आहे ज्यात या ट्विटमध्ये आपणास असे पाहावयास मिळते आहे की एक डॉगी म्हणजे कुत्रा गाडीवर ड्रायव्हिंग सीटवर बसेल आहे आणि तो ट्रॅफिक पोलिसांना आपले लायसन्स दाखवत आहे.

अणि ह्या लायसनवर ट्विटरचा जुना लोगो म्हणजेच निळा पक्षी सुदधा दिलेला आहे.

ह्या चित्रात असे दाखवले आहे की हा डाॅगी ट्रॅफिक पोलिसांना असे सांगतो आहे की हा माझा जुना फोटो म्हणजेच जुना लोगो आहे.

इलाॅन मस्क यांच्या ह्या नवीन टविटर लोगोमुळे सोशल मिडिया वर चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे.अनेक जण ट्विट करून इलाॅन मस्क यांच्या ह्या निर्णयावर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त करताना आपणास दिसून येत आहे.

अनेक जण असे देखील म्हणत आहे टविटरके लोगो से चिडिया हटाके इलाॅन मस्कने कुत्ता लगा दिया है

टविटरका नया सीईओ बडा कमाल है अशा देखील प्रतिक्रिया ट्विटरवर पोस्ट होताना दिसुन येत आहेत.

See also  महिलांनी मोबाईल ॲप दवारे हाफ तिकिट दर सवलतीमध्ये एसटी बसचे तिकिट रिझरवेशन कसे करायचे? 50 percent discount for women on reservation through MSRTC app