हायपोग्लायसेमिया म्हणजे काय?Hypoglycemia information in Marathi

हायपोग्लायसेमिया म्हणजे काय?Hypoglycemia information in Marathi

डायबिटीस झाल्यामुळे आपणास दोन प्रकारच्या समस्या प्रामुख्याने उद्भभवत असतात.

पहिली समस्या म्हणजे रक्तातील साखर प्रमाणापेक्षा अधिक वाढणे,अणि दुसरी समस्या आहे रक्तातील साखर खुप कमी होणे.

जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण, ग्लुकोजचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा खुपच कमी होत असते तेव्हा त्यास हायपोग्लायसेमिया असे म्हटले जाते.

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने जे दुष्परिणाम होतात ते आपणास लगेच दिसुन येत नाही पण रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यामुळे जे दुष्परिणाम उद्भवत असतात ते आपणास त्वरीत निदर्शनास येत असतात.

Hypoglycemia information in Marathi
Hypoglycemia information in Marathi

अणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यामुळे आपणास त्रास देखील लगेच जाणवत असतो.

पण जर आपणास हायपोग्लायसेमियाची लक्षणे कोणकोणती आहेत याची कारणे काय आहेत हे माहीत असेल अणि ही लक्षणे जर आपणास स्वतामध्ये दिसुन येत असतील तर आपण त्वरीत डाॅक्टरांचा सल्ला घेऊन यावर योग्य तो उपचार देखील करू शकतो.

सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हायपोग्लायसेमिया कशामुळे होतो हे आपल्याला माहीत असल्यास याच्या कारणांपासुन देखील आपणास बचाव करता येतो.ही कारणे आपण योग्य ती काळजी घेऊन पुढच्या वेळी टाळू शकतो.

एखाद्या व्यक्तीला हायपोग्लायसेमिया झाला असे कधी म्हटले जाते?

जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण ७० मिलीग्रॅम डे.ली पेक्षा खुप कमी होत असते तेव्हा त्या व्यक्तीला हायपोग्लायसेमिया झाला असे म्हटले जाते.

हायपोग्लायसेमियाची प्रमुख कारणे कोणकोणती आहेत?

१)पुरेसा आहार न घेणे –

आपल्या रक्तात साखर यकृतादवारे तसेच आपण खाल्लेल्या अन्नाच्या माध्यमातून येत असते.

आपण जे काही अन्नपदार्थ खात असतो पचनानंतर त्याचे साखरेत रूपांतर होते अणि हीच साखर आपल्या रक्तात शोषली जाते.

See also  व्ही आर एस फुलफाँर्म अणि त्याचा अर्थ - VRS meaning and full form in Marathi

याचसोबत आपण जे काही अन्नपदार्थ खात असतो आणि ज्याचे पचनानंतर साखरेत रूपांतर होते ही साखर काही प्रमाणात आपल्या यकृतात देखील संग्रहित होते.

अणि जेव्हा रात्री आपण झोपलेलो असतो किंवा कुठलेही अन्नपदार्थ खात नाही अशावेळी यकृतातील ही साखर बाहेर पडत असते.ज्यामुळे आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ लागते.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर अन्नाच्या माध्यमातून आपल्या रक्तात जी साखर येत असते ती आवश्यक तेवढ्या प्रमाणात नाही आली तर आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी कमी होत असते.

२) रक्तातुन प्रमाणापेक्षा अधिक साखर बाहेर पडणे –

जेव्हा आपण व्यायाम कसरत तसेच कुठलीही शारीरिक हालचाली करत असतो तेव्हा आपल्या रक्तातील साखरेचा वापर होत असतो.तसेच ती बाहेर पडत असते.

आपल्या दैनंदिन जीवनात आपण जर आवश्यकतेपेक्षा अधिक जास्त शारीरिक कसरत व्यायाम केला, प्रमाणापेक्षा अधिक शारीरिक हालचाल केली धावपळ केली तर अशावेळी देखील आपल्या रक्तातील साखर प्रमाणापेक्षा कमी होते.

३) डायबिटीसच्या गोळ्या औषधे प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात घेणे-

आपण रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी ज्या इंन्सुलिनच्या गोळ्या तसेच इंजेक्शन घेत असतो त्यांचा ओव्हर डोस घेतल्याने देखील रक्तातील साखरेचे प्रमाण प्रमाणापेक्षा कमी होते.

४) अधिक प्रमाणात व्यायाम करणे व कमी आहार घेणे तसेच वेळेवर जेवन न करता औषधे घेणे –

समजा एखाद्या व्यक्तीने प्रमाणापेक्षा अधिक व्यायाम केला कसरत केली अणि खुपच कमी आहाराचे सेवन केले किंवा गोळ्या औषधे वेळेवर घेतली पण जेवणच वेळेवर केले नाही.अशावेळी देखील रक्तातील साखरेचे संतुलन बिघडते.

५) प्रमाणापेक्षा अधिक मद्यपान करणे –

जर आपण प्रमाणापेक्षा अधिक मद्याचे सेवन केले तरी देखील आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते.

हायपोग्लायसेमियाची प्रमुख लक्षणे कोणकोणती आहेत?

हायपोग्लायसेमिया झाल्यावर आपणास सुरूवातीला खालील प्रमाणे काही प्राथमिक लक्षणे दिसुन येत असतात –

See also  प्रौढांपेक्षा बाळं कमी वेळा का डोळे मिचकावतात? -Baby blink less

हायपोग्लायसेमियाची काही प्राथमिक लक्षणे –

रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ लागल्यावर खालील प्राथमिक लक्षणे दिसुन येतात –

१) खुप घाम येणे

२) थोडेसे डोके दुखणे

३) हातापायाचा थरकाप होणे

४) छातीमध्ये धडधड वाढु लागणे

५) स्वभावात चिडचिडेपणा येणे

६) जास्त भुक लागणे

७) ओठाला मुंग्या येणे

इत्यादी

हायपोग्लायसेमियावर करावयाचे प्राथमिक उपाय –

आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ लागत असल्यास ते वाढण्यासाठी आपण आवश्यक ते औषधोपचार करायला हवे.

वरील सर्व लक्षणे आपणास आपल्या मध्ये दिसुन येत असतील तर आपण त्वरीत डाॅक्टरांचा सल्ला घेऊन रक्तातील साखरेचे प्रमाण चेक करायला हवे.

अणि रक्तातील साखर वाढण्यासाठी आपण ग्लुकोजचे सेवन करायला हवे.ग्लुकोजचे सेवन आपणास पाण्यासोबत देखील करता येते.याचसोबत आपण ग्लुकोजच्या गोळ्या किंवा ग्लुकोज पावडर देखील घेऊ शकतो.

पण रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ लागत आहे हे दिसुनही आपण त्यावर योग्य वेळी उपचार केला नाही तर हळूहळू आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक कमी होऊ शकते अणि याच्या लक्षणांमध्ये अधिक वाढ होण्याची संभावना असते.

रक्तातील साखरेचे प्रमाण खुप कमी झाल्यावर खालील मध्यम स्वरुपाची काही लक्षणे दिसुन येतात.

१)एकाग्रता कमी होणे

२)चक्कर येणे

३)डोळ्यांना अंधुक तसेच अस्पष्ट दिसणे

४)विसराळू बनणे गोष्टी विसरू लागणे

५) रागराग चिडचिड होणे

६) तोतरे बोलायला लागणे

हायपोग्लायसेमियाची गंभीर लक्षणे –

वरील मध्यम स्वरुपाची लक्षणे दिसुन आल्यानंतर देखील आपण यावर डाॅक्टरांचा सल्ला घेऊन योग्य तो उपचार केला नाही तर अशा परिस्थितीत आपला हायपोग्लायसेमिया हा एक गंभीर स्तरावर पोहोचु शकतो.

असे झाल्यास आपणास फिट येऊ शकतो किंवा आपण एखाद्या वेळी कोमात देखील जाऊ शकतो.आपल्या मेंदुवर विपरीत परिणाम होऊ शकतो किंवा आपला यात मृत्यू देखील होऊ शकतो.