आयआरसीटीची एक नवीन उत्तम योजना प्रवास आत्ता करा पैसे नंतर द्या – IRCTC new scheme travel now pay later in Marathi

आय आरसीटीची  योजना प्रवास आत्ता करा पैसे नंतर द्या – IRCTC new scheme travel now pay later in Marathi

जे यात्रेकरू नेहमी रेल्वेने प्रवास करत असतात त्यांच्यासाठी रेल्वेकडुन एक लाभकारी अणि उत्तम योजना सुरू करण्यात आलेली आहे.ह्या योजनेचे नाव आहे ट्रँव्हल नाऊ पे लँटर असे आहे.

म्हणजे आता आपल्या खिशात पुरेसे पैसे नसले तरी देखील आपल्याला रेल्वेने प्रवास करता येणार आहे.

प्रवास आत्ता करायचा अणि पैसे नंतर द्यायचे ही प्रवाशांसाठी एक भन्नाट योजना रेल्वेने सुरु केली आहे.

ही योजना नेमकी काय आहे हेच आपण आजच्या लेखात सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

ट्रँव्हल नाऊ पे लँटर म्हणजे काय?Travel now pay later scheme meaning in Marathi

ट्रँव्हल नाऊ पे लँटर ही एक सुविधा आहे जी रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी सुरू केली आहे.

ह्या सुविधेचा लाभ घेत आपण खिशात पुरेसे पैसे नसताना देखील आपल्या परिवारासमवेत रेल्वेने प्रवास करू शकणार आहे.

अणि आपला प्रवास पुर्ण झाल्यानंतर काही ठाराविक कालावधीने आपण हे पैसे फेडू शकतो.तसेच रेल्वेला देऊ शकतो.

ह्या योजनेकरीता आय आरसीटीसी ने कँश CASH e सोबत पार्टनरशिप केली आहे.

ट्ँव्हल नाऊ पे लँटर योजनेचा फायदा काय आहे?

ट्रँव्हल नाऊ पे लँटर ह्या योजनेचा लाभ घेत आपण म्हणजेच ज्याच्याकडे कुटुंबासमवेत तत्काळ रेल्वेने प्रवास करण्यासाठी खिशात पुरेसे पैसे नही अशी सर्वसामान्य गरीब कुटुंबातील व्यक्ती देखील प्रवास करू शकणार आहे.

See also  मालेगाव येथे मनपामध्ये फायरमन अग्नीशमन विमोचक पदाच्या 50 जागांसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू- Malegaon Mahanagar Palika Recruitment 2023 In Marathi

ह्या सुविधेचा लाभ घेऊन आपल्याला आता कुठलेही अमाऊंट लगेच भरण्यासाठी जवळ नसताना देखील प्रवासासाठी रेल्वेचे तिकिट बुक करता येणार आहे.

जेव्हा आपल्याला एमरजन्सीमध्ये बाहेरगावी जाण्यासाठी तत्काल रेल्वेचे तिकिट बुक करायचे असते अणि आपल्याकडे लगेच त्या क्षणी तिकिटाचे पैसे भरायला पुरेसे पैसे नसतात अशा वेळी आपण ह्या ट्ँव्हल नाऊ पे लँटर सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहे.

ही सुविधा आयारसीटीसीच्या रेल कनेक्ट अँपवर सुदधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रवाशांनी तिकिटाच्या पैशांची परतफेड कशी करायची?

आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल तत्काल आपल्याला खिशात पुरेसे पैसे नसताना देखील रेल्वेचे तिकिट प्रवासासाठी बुक करता येईल पण नंतर हे पैसे आपल्याला फेडावे लागणारच आहे मग हे पैसे कसे फेडायचे त्यासाठी काय करावा लागेल.

जेव्हा आपण तिकिट बुक करतो तेव्हाच आपल्याला तसे आँप्शन निवडायचे आहे.

आय आरसीटीने आता कँशसोबत भागिदारी केली असल्याने रेल्वे प्रवाशांना आता आपल्या तिकिटाचे पैसे ईएम आयने फेडता येणार आहे.

ईएम आयने पैसे फेडण्यासाठी आपल्याला म्हणजेच रेल्वे प्रवाशांना दोन पर्याय दिले जातात यात पहिला पर्याय आहे तीन महिन्यांचा दुसरा पर्याय आहे सहा महिन्यांचा.

आपल्या सुविधेनुसार आपण दोघांपैकी कोणताही एक पर्याय निवडु शकतो.ज्यांना तीन महिन्यात तिकिटाचे पैसे रिटर्न करता येत असतील ते तीन महीन्यांचे आँप्शन निवडु शकतात.अणि ज्या प्रवाशांना तीन महिन्यात लगेच ईएम आयने तिकिटाचे पैसे फेडता येत नसतील ते आपल्या सुविधेनुसार सहा महिन्यांचे आँप्शन देखील सिलेक्ट करू शकतात.

ट्रँव्हल नाऊ पे लँटर ह्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना काय करावे लागेल?

ट्रँव्हल नाऊ पे लँटर ह्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना फक्त तिकिट बुक करताना आपल्या सुविधेनुसार तीन ते सहा महिन्यांच्या ईएम आयचे आँप्शन निवडायचे आहे.अणि तिकिट बुक करताना त्याची नोंद बुकिंगमध्ये करायची आहे.

See also  एच पी सी एल मध्ये परमनंट भरती सुरू- अनुभवी किंवा फ्रेशर उमेदवार करीता - HPCL recruitment 2023 in Marathi

ट्ँव्हल नाऊ पे लँटर या सुविधेचा लाभ घेण्यासाठी कोणते डाँक्युमेंट लागतील?

ट्ँव्हल नाऊ पे लँटर या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना को़णतेही डाँक्युमेंट सबमीट करण्याची आवश्यकता नाहीये.