भारताचे लुनार पोलार एक्सप्लोरेशन मिशन काय आहे? Lupex mission meaning in Marathi

भारताचे लुनार पोलार एक्सप्लोरेशन मिशन काय आहे?lupex mission meaning in Marathi

नुकतेच २३ आॅगस्ट रोजी भारताच्या चंद्रयान ३ ने चंद्राच्या पृष्ठभागावर साॅफ्ट लॅडिंग करत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला अणि एकमेव देश म्हणून विश्वविक्रम नोंदविला आहे.

पण इस्रोने आता आपल्या ह्या चंद्रयान ३ मधील यशानंतर आणखी जोरात कामाला सुरुवात केली आहे इस्रोने नुकतीच एक नवीन मोहीम हाती घेतली आहे.हया मिशन अंतर्गत चंद्रावर पुन्हा एकदा अंतराळ पाठवले जाईल.

आता इस्रोने जपानच्या सहकार्याने संयुक्त रीत्या एक नवीन मोहीम हाती घेतली आहे.

ह्या नवीन मोहीमेचे नाव लुपेक्स लुनार पोलार एक्सप्लोरेशन मिशन असे आहे.यालाच मराठी मध्ये चंद्राच्या ध्रुवावरील संशोधन असे देखील म्हटले जाते.

किंवा ह्या मोहीमेला चंद्रयान ४ म्हणून देखील ओळखले जाऊ शकते.फक्त फरक एवढाच असेल की चंद्रयान ३ मध्ये भारताचे इस्रो मधील वैज्ञानिक फक्त समाविष्ट होते पण ह्या चंद्रयान ४ मिशन मध्ये जपानच्या वैज्ञानिकांचा देखील समावेश असणार आहे.

हया मिशनसाठी भारतातील अंतराळ संशोधन संस्था इस्रो अणि जपान मधील जाक्सा नावाची एक एअरोस्पेस एक्सप्लोरेशन संस्था सध्या रोव्हर अणि लॅडरची निर्मिती करत आहे.

यात भारताकडुन लॅडर बनवले जाणार आहे अणि रोव्हर अणि राॅकेट बनवण्याची जबाबदारी जपानच्या एअरोस्पेस एक्सप्लोरेशन संस्था जाक्साने घेतली आहे

भारत अणि जपान दोघे देश मिळुन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळयान पाठविण्याच्या तयारीला लागलेले आहेत.हया मिशनमध्ये लॅडर अणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर तपासणी केली जाईल.

असे सांगितले जात आहे की हे मिशन २०२६ ते २०२८ दरम्यान पुर्णत्वास येऊ शकते.पण अद्याप ह्या मिशनबाबद कुठलीही अधिकृत घोषणा इस्रो कडुन करण्यात आली नाहीये.

असे सांगितले जात आहे की भारत चंद्रयान दोन अणि चंद्रयान ३ मिशन मधील अनुभवांनुसार ह्या चंद्रयान ४ मिशन मध्ये बदल करेल.

See also  इंटरनेट अणि मानवी जीवन - इंटरनेट म्हणजे काय ?

चंद्रयान ४ मिशनचे उद्दिष्ट काय असणार आहे?

चंद्रयान ४ म्हणजे लुपेक्स लुनार पोलार एक्सप्लोरेशन मिशनचे उद्दिष्ट चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्ठभागावर पाण्याचे संशोधन करणे तसेच इतर खनिज पदार्थाविषयी माहीती गोळा करणे हे असणार आहे.

हे मिशन यशस्वी झाल्यास चंद्राच्या पृष्ठभागावर दीड मीटर खडडे करून चंद्राच्या पृष्ठभागावरील नमुना आणला जाईल.

ह्या मिशनचे उद्दिष्ट चंद्राचा पाया स्थापित करण्याच्या व्यवहार्यतेचे मूल्यांकन करणे आणि पृष्ठभागाच्या अन्वेषण तंत्रज्ञानामध्ये प्रगती करणे.

चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात पाण्याची उपस्थिती तपासणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असेल.याचसोबत ध्रुवीय प्रदेशात दीर्घकालीन स्टेशन उभारण्याची शक्यता देखील तपासली जाणार आहे.