Mortgage loan म्हणजे काय? कसा अर्ज करावा ? तारण कर्ज संपूर्ण माहीती – Mortgage loan information in Marathi

 तारण कर्ज Mortgage  संपूर्ण माहीती Mortgage loan information in Marathi

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ कधीतरी नक्कीच येत असते.जेव्हा आपल्याला पैशांची अत्यंत गरज असते.आणि वेळेवरच आपल्याकडे पैसे राहत नसतात.

अशावेळी आपल्यासमोर तीनच पर्याय शिल्लक असतात ज्यात आपण एकतर कोणाकडुन तरी उसने पैसे घेत असतो,एखाद्याकडुन व्याजाने पैसे उचलत असतो किंवा बँकेतुन लोन घेत असतो.

पण बँकेतुन लोन घ्यायचे म्हटले तर बँक आपल्याला लोन देण्याअगोदर काहीतरी तारण मागत असते.अशा परिस्थितीत आपल्याकडे तारण ठेवायला इतर कोणतीही मौल्यवान वस्तु नसल्यामुळे आपण आपले घर गहाण ठेवून बँकेकडून कर्ज घेत असतो.ज्याला माँरगेज लोन असे म्हटले जात असते.

आजच्या लेखात आपण ह्याच माँरगेज लोनविषयी सविस्तर माहीती जाणुन घेणार आहोत.

माँरगेज लोन कशाला म्हणतात?

बाजारात आज अनेक असे विविध प्रकारचे लोन उपलब्ध आहेत.जे आपल्याला बँकेकडुन तसेच एखाद्या संस्था,कंपनीकडुन दिले जात असते.

ज्यात पर्सनल लोन,एज्युकेशन लोन,गोल्ड लोन,वेडिंग लोन,होम लोन,कार लोन इत्यादी अशा विविध लोन्सचा समावेश होत असतो.

माँरगेज लोन हे सुदधा एक लोनचाच प्रकार आहे ज्यात आपण पैशांची गरज पडल्यावर बँकेकडुन कर्ज प्राप्त करण्यासाठी आपले घर बँकेकडे तारण ठेवत असतो.

माँरगेज लोनची वैशिष्टये कोणकोणती असतात?

माँरगेज लोनची वैशिष्टये पुढीलप्रमाणे असतात :

  • आपल्या प्राँपर्टीची जेवढी किंमत असेल तिच्या कमीत कमी 60 टक्केपर्यत आपण माँरगेज लोन प्राप्त करू शकतो.आणि कधी कधी हेच लोन 80 टक्केपर्यत देखील आपल्याला प्राप्त होऊन जात असते.
  • माँरगेज लोन हे आपल्याला कमीत कमी 5 ते 6 लाखापर्यत आणि जास्तीत जास्त 10 ते 15 करोडपर्यत 15 ते 20 वर्षासाठी साधारणत प्राप्त होत असते.
  • आपण माँरगेज लोन कधीपर्यत फेडायचे आहे आणि कोणत्या कालावधीपर्यत फेडायचे हे निश्चित करण्याचा अधिकार हाऊसिंग फायनान्स कंपनीला असतो.
See also  Scheduled आणि Non Scheduled Bank यात काय फरक आहे? - Difference in Scheduled Non Scheduled Bank

पण आपल्याला जर शक्य असेल तर आपण दिलेल्या कालावधीच्या आत देखील आपले पैसे फेडु शकतो.

  • बँक आपल्याला आपल्या माँरगेज प्राँपर्टीचा इंशुरन्स देखील काढायला सांगत असते.
  • होम लोन घेण्यासाठी आपल्याला लोन देत असलेल्या व्यक्ती तसेच कंपनीला दहा टक्के डाऊन पेमेंट देखील आपल्याला द्यावे लागत असते.
  • लोनची रक्कम दर महिन्याला वर्षाला जसे जसे आपण फेडत जातो तशी कमी होत जात असते.

माँरगेज लोन वेळेवर फेडले नाही तर काय होते?

 कोणत्याही प्राँपर्टीवर लोन देण्याचे काम बँकेचे किंवा फायनान्स कंपनीचे असते.

जेव्हाही आपल्याला बँक किंवा एखादी फायनान्स कंपनी प्राँपर्टी च्या बदल्यात लोन देत असते.तेव्हा त्याला सिक्युअर लोन असे देखील म्हटले जात असते.

कारण यात बँक आपल्याला ईएम आयची रक्कम फेडायला तीन महिन्याचा कालावधी देत असते.

आणि तीन महिन्यात आपण ईएम आय नही भरला तर बँक आपल्या प्राँपर्टीवर देखील जप्ती आणु शकते.कारण बँकेकडे आपल्या प्राँपर्टीचे सर्व डाँक्युमेंट जमा असतात आणि आपण आपले कर्ज वेळेत फेडले नाही तर बँक त्यावर आपला मालकी हक्क घेऊ शकते.

आणि शिवाय आपला सिव्हील स्कोअर खराब झाल्यामुळे जो पर्यत आपण आधीचे लोन फेडत नाही तोपर्यत आपल्याला इतर बँकेतुन लोन देखील प्राप्त होत नसते.

 

- Mortgage loan information in Marathi
Mortgage loan information in Marathi

माँरगेज लोन किती आणि कोणकोणत्या प्रकारचे असतात?

 माँरगेज लोन हे दोन प्रकारचे असतात :

1) ओरल माँरगेज लोन :

2) रजिस्टर माँरगेज लोन :

1)ओरल माँरगेज लोन :

ओरल माँरगेज लोन हा लोनचा एक असा प्रकार आहे ज्यात ज्यात हाऊसिंग फायनान्स कंपनीकडुन तसेच बँकेकडुन आपल्या प्राँपर्टीचे डाँक्युमेंटस चेक केले जात असतात.आणि मग प्राँपर्टीचे डाँक्युमेंट चेक करून झाल्यावर अँग्रीमेंट पेपरवर सही करून आपल्याला लोन देत असतात.

ओरल माँरगेज लोनमध्ये आपल्याला माँरगेज रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता पडत नाही.

2) रजिस्टर माँरगेज लोन :

See also  एफडी कॅल्क्युलेटर कसे वापरावे? । How to Use an FD calculator In Marathi

रजिस्टर माँरगेज लोन हा माँरगेज लोनचा एक असा प्रकार आहे ज्यात आपण आपल्या माँरगेज प्राँपर्टीचे रजिस्ट्रेशन करत असतो.आणि ह्यामध्ये आपल्या प्राँपर्टीच्या माँरगेज रजिस्ट्रेशनवर जो चार्ज घेतला जात असतो तो सरकारी आकडेवारीत जमा केला जात असतो.

रजिस्टर् माँरगेज लोन मध्ये कर्ज घेत असलेल्या व्यक्तीला नोंदणी फी म्हणजेच रजिस्ट्रेशन चार्ज फेडणे अनिवार्य असते.

माँरगेज लोनचे फायदे कोणकोणते असतात?

 माँरगेज लोन घेण्याचे आपल्याला अनेक फायदे प्राप्त होत असतात.

  • माँरगेज लोनमध्ये आपण जास्तीत जास्त लोन प्राप्त करू शकतो.
  • ज्यांचा स्वताचा व्यवसाय आहे त्यांना उद्योग व्यवसायासाठी अधिकाधिक लोन प्राप्त करण्यासाठी माँरगेज लोन घेणे अधिक फायदेशीर ठरत असते.
  • माँरगेज लोन प्राप्त करण्यासाठी आपल्याला वेळही कमी लागत असतो आणि डाँक्युमेंट देखील जास्त लागत नसतात.
  • बँकेने दिलेल्या कालावधीच्या आत जर आपण घेतलेले लोन फेडले तर बँकेकडुन आपल्याला आपला सिव्हील स्कोर चांगला असल्यामुळे जास्तीत जास्त आँफर दिल्या जात असतात.

माँरगेज लोन प्राप्त करण्यासाठी लागणारी पात्रता :

  • माँरगेज लोन प्राप्त करण्यासाठी आपण एक निश्चित रोजगार असलेली व्यक्ती असणे गरजेचे असते.
  • माँरगेज लोन प्राप्त करण्यासाठी आपण भारताचे नागरीक असणे देखील गरजेचे असते.
  • माँरगेज लो घेण्यासाठी आपले वय 23 ते 25 असावे लागते आणि हे लोन आपल्याला 65 ते 70 वय होईपर्यत फेडता येत असते.
  • आपल्या लोन घेण्याच्या क्षमतेची पडताळणी करण्यासाठी आपली आर्थिक परिस्थिती,सिव्हील स्कोअर आणि इन्कम देखील चेक केला जात असतो.

माँरगेज लोन प्राप्त करण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे :

  • आय डें टीटी प्रुफ ,-आधार कार्ड,पँन कार्ड,मतदान कार्ड इत्यादी
  • अँड्रेस प्रूफ –
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मागील सहा वर्षाचे बँकिंग स्टेटमेंट
  • आपल्या प्राँपर्टीचे डाँक्युमेंट

आँनलाईन माँरगेज लोन प्राप्त करण्यासाठी अर्ज कसा करावा?

 आँनलाईन माँरगेज लोन प्राप्त करण्यासाठी आपण सर्वप्रथम माँरगेज लोन वेबसाईटवर जावे

  • आणि मग आपल्या प्राँपर्टीच्या किंमतीनुसार नुसार माँरगेज लोनची पात्रता निवडावी.
  • आणि मग माँरगेज लोन घेण्यासाठी कोणकोणते डाँक्युमेंट लागतात ते चेक करावे.
  • आणि मग सर्व काही चेक करून झाल्यावर अँप्लाय फाँर माँरगेज लोन ह्या बटणवर प्रेस करून आपण आपल्याला विचारली जाणारी सर्व माहीती तिथे व्यवस्थित भरावी
  • आणि मग त्याला आवश्यक असलेले डाँक्युमेंट देखील अटँच करावेत
  • आणि मग शेवटी आपला अर्जाचा फाँर्म सबमीट करायचा असतो.
See also  बचत करावी का गुंतवणुक,योग्य काय ? Saving or Investment in Marathi

फाँर्म सबमीट केल्यानंतर आपली सर्व डिटेल्स चेक केली जाते आणि मग आपण लोनसाठी पात्र ठरत असल्यास आपल्याला लोनसाठी अँप्रूव्ह करून लोन दिले जात असते.

Mortgage loan विषयी वारंवार विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न -Mortgage loan information in Marathi

 1)माँरगेज लोन फेडल्सास बँक आपली सर्व संपत्तीवर जप्ती आणत असते का ?

नही माँरगेज लोन आपण ज्या प्राँपर्टीच्या आधारावर घेतले आहे फक्त त्याच प्राँपर्टीवर बँक जप्ती आणु शकते.आपल्या इतर मालमत्तेवर जप्ती करण्याचा कुठलाही अधिकार बँकेकडे नसतो.

2) माँरगेज लोन घेण्यासाठी आपण आपल्या प्राँपर्टीमध्ये काय काय गहाण ठेवू शकतो?

माँरगेज लोन प्राप्त करण्यासाठी आपण आपले घर,जमीन,गाडी,दागदागिने इत्यादी संपत्ती गहाण ठेवू शकतो.

3) माँरगेज लोन आपण किती वर्षासाठी घेऊ शकतो?

माँरगेज लोन आपण कमीत कमी दोन वर्षे आणि जास्तीत जास्त वीस वर्षासाठी प्राप्त करू शकतो.

4) माँरगेज लोनमध्ये आपल्याला किती लोन प्राप्त होत असते?

 माँरगेज लोन आपण किती काढु शकतो हे आपल्या प्राँपर्टीच्या किंमतीवरून ठरवले जात असते.आपण गहाण ठेवत असलेल्या प्राँपर्टीची किंमत जर जास्त असेल तर आपल्याला जास्त लोन प्राप्त होते आणि आपल्या प्राँपर्टीची किंमत जर कमी असेल तर आपल्याला कमी लोन प्राप्त होत असते.

5) माँरगेज लोन कोणाला प्राप्त होते?

 ज्याच्याकडे बँकेत गहाण ठेवण्यासाठी स्वताची संपत्ती आहे आणि इन्कमचे फिक्स सोर्स आहे अशा व्यक्तीला माँरगेज लोन प्राप्त होत असते.

[rpwe limit="05"]