HSN कोड म्हणजे काय ? HSN code information Marathi – 6 अंकीकोड – 5 कोटीपेक्षा जास्त व्यावसायिक उलढाल

HSN code information Marathi भारत सरकार,वित्त मंत्रालयाने HSN (हार्मोनाइज्ड सिस्टम ऑफ नोंमेनक्लेचर ) कोड’ याच्या व्यवस्थे अंतर्गत  नवीन नियम व …

Read more

पर्यावरणाची काळजी – साध्य सोप्या 15 गोष्टी – नक्की हातभार लावा – How can we take care of environment in Marathi

save environment

How can we take care of environment in Marathi-पर्यावरणाची काळजी आपण आपल्या पर्यावरणाची काळजी कशी घ्यायची?तसेच पर्वावरणाची काळजी घेण्यासाठी आपण …

Read more

श्री संत तुकाराम महाराज अभंग – काय ते वानावे वाचेचे पालवे ! Sant Tukaram Maharaj Abhang

“संत तुकारामांचा जीवनविचार' हे प्रा. डॉ.निर्मलकुमार फडकुले लिखित पुस्तक १९९९ साली “सुविद्या प्रकाशन' यांनी प्रकाशित केले. त्या पुस्तकाचे सर्वाधिकार लेखकाचे चिरंजीव व वारस श्री अजित फडकुले यांच्याकडे आहेत. थोडेसे मनातले ..... तुकयाची अभगंवाणी हे महाराष्ट्राचं अमूल्य असं वैचारिक घन आहे. सामान्यापासून विद्वानापर्यंत तुकारामांचे अभंग सर्वांनाच आकृष्ट करु न घेतात. लोकमानसात इतका दृढपणे रुजलेला दुसरा संतकवी नाही असं म्हटल्यास त्यात अतिशयोक्ती नाही. तुकारामांच्या प्रत्येक अभंगात त्यांचा जीवनविषवक विचार प्रकट झाला आहे. प्रत्येक अभंगात त्यांचं व्यक्तित्व स्पष्टपणानं उमटलं आहे. 'तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाचि वाद आपुल्यासी ।' स्वसंवाद करणारे तुकोबा समाजाशीही सतत बोलत होते. लोकजीवन त्यांनी न्याहाळलं. भलेबुरे अनुभव घेतले. आपल्या अनुभवांची कहाणी त्यांनी अभंगांतून सांगितली आहे. ही कहाणी सांगतानाच हा तुकोबा नावाचा मेघ जनतेच्या मनोभूमीवर आपल्या विचाररूपी अमृतधारांची बरसात करीत राहिला. तुकोबा केवळ संत आणि केवळ कवी नव्हते. ते जीवनाचा सूक्ष्म दृष्टीनं शोध घेणारे तत्वचिंतक होते. म्हणूनच त्यांनी आपल्या कवितांतून जीवनविचार उत्कटतेनं मांडला आहे. या समाजनिष्ठ संतकवीचं त्याच्या अभंगांतून जे दर्शन होतं. ते जितकं प्रसत्ञ तितकंच उद्बोधक आणि प्रेरक असतं.या पुस्तकात डॉ.निर्मलकुमार फडकुले ह्यांनी तुकोबांचे सुमारे ७८ अभंग निवडून त्यावर त्यांच्या दृष्टिकोनातून भाष्य केलं आहे. आधारासाठी अभंग घेऊन त्यातील जीवनविचार विवरून सांगताना त्यांच्या कल्पना आणि विचार या भाष्यांत मिसळलेले आहेत. सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वताएवढे ॥ घरी घरी आठवण । मानी संतांचे वखन ।॥। नेले रात्रीने ते अर्थे । बाळपण ते जराव्वाथे ॥ तुका म्हणे पुढा । घाणा जुंती जसी मूढा ।। संत म्हणजे केवळ देवाचे भजन करणारा एक भक्त असतो अशी कल्पना करणं चुकीचं आहे. संतांच्या हृदयात ईश्वरभक्ती असतेच. पण जीवनाची चिकित्सा करण्याची त्यांची प्रवृत्ती असते. हे जग काय आहे, या जीवनाचा नेमका अर्थ काय असू शकेल इत्यादी गूढ प्रश्नांची ते आपल्या अनुभवाच्या संदर्भात साधक बाधक चर्चा करतात. संत तुकारामांनी जीवनविषयक प्रश्नांची खोल चर्चा आपल्या अभंगांतून केली आहे. ते जीवनाचे आणि समाजाचे अभ्यासक होते. या तत्त्वचिंतक संतानं आपल्या अनुभवांचं सार स्पष्टपणानं मांडलं आहे. तुकोबांच्या डोळ्यांदेखत त्यांची पहिली पत्नी आणि मूल दुष्काळात मरण पावले. वडील भाऊ परागंदा झाला. आईवडिलांचा वियोग झाला होता. एकेकाळी चांगली चालणारी दुकानदारी दुष्काळामुळं उध्वस्त झाली होती. गावातली माणसं उपासमारीनं गांजून गेली होती. त्यांच्या जगण्यालाही अर्थ नव्हता आणि मरण्यालाही अर्थ नव्हता. सब्त तुकाराम उघड्या डोळ्यांनी मानवी दु:खदैऱ्याचं हे विचित्र स्वरूप पाहात होते. त्यांना स्वतःलाही आयुष्याबरोबर सतत झगडावं लागलं. त्यात त्यांना अनेक जखमा झाल्या. माणसाच्या आयुष्यातली ही प्रचंड उलथापालथ पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या अभंगांतून एक निष्कर्ष काढला. या जगात सुख जवाइतकं थोडं आहे. दु:ख मात्र पर्वतासारखं प्रचंड आहे. यासाठी संतांचं वचन मान्य करून ते नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे असं ते म्हणतात. तुकोबा काही निराशावादी नव्हते. पण जवाइतकं सुख असतं आणि पर्वंतप्राय दु:ख असतं. कृपया पूर्ण पुस्तक वाचण्या करता इथ भेट द्यावी

श्री संत तुकाराम महाराज अभंग -Sant Tukaram Maharaj Abhang “संत तुकारामांचा जीवनविचार’ हे प्रा. डॉ.निर्मलकुमार फडकुले लिखित पुस्तक १९९९ साली …

Read more