व्हाॅईस अणि नाॅन व्हाॅईस प्रोसेस म्हणजे काय?व्हाॅईस अणि नाॅन व्हाॅईस प्रोसेस या दोघांमध्ये काय फरक असतो? – What is voice and non voice process

बीपीओ मधील व्हाॅईस अणि नाॅन व्हाॅईस प्रोसेस म्हणजे काय?व्हाॅईस अणि नाॅन व्हाॅईस प्रोसेस या दोघांमध्ये काय फरक असतो? – What is voice and non voice process

बीपीओ मध्ये एकुण दोन प्रोसेस असतात पहिली असते व्हाॅईस प्रोसेस अणि दुसरी असते नाॅन व्हाॅईस प्रोसेस.
व्हाॅईस प्रोसेस अणि नाॅन व्हाॅईस या दोन्ही प्रोसेस करीता आपल्याकडे इंटरनेटचे कंप्युटरचे नाॅलेज असणे खुप आवश्यक असते.

व्हाॅईस प्रोसेस मध्ये कस्टमरला सपोर्ट देताना त्यांच्या तक्रारीचे निवारण करताना काॅलिंग,एस एम एस,चॅटिंग इत्यादीचा समावेश होतो.पण नाॅन व्हाॅईस प्रोसेस मध्ये काॅलिंगचा समावेश होत नसतो.

नाॅन व्हाॅईस प्रोसेस मध्ये कस्टमरला सपोर्ट देताना त्यांच्या तक्रारीचे निवारण करताना काॅलिंगचा वापर न करता ईमेल,वेब चॅट,पोर्टल चॅट,एस एम एस वगैरेचा उपयोग केला जातो.

व्हाॅईस प्रोसेस करीता आपले शाब्दिक संवाद कौशल्य उत्तम असावे लागते.अणि नाॅन व्हाॅईस प्रोसेस करीता आपले लेखी संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम असणे आवश्यक आहे.

नाॅन व्हाॅईस प्रोसेस मध्ये आपल्याला फक्त मजकुराच्या माध्यमातुन ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करता येत असते.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर व्हाॅईस प्रोसेस मध्ये आपण डायरेक्ट ग्राहकांशी फोनवर बोलत असतो अणि त्यांच्या तक्रारी अडचणी समस्या ऐकून घेत त्यांचे निवारण करत असतो.

अणि नाॅन व्हाॅईस प्रोसेस मध्ये आपण ग्राहकांशी डायरेक्ट फोनवर बोलत नसतो.फोनवर त्यांच्याशी कुठलाही संवाद साधत नाही.त्यांच्या सर्व तक्रारी अडचणी समस्या मजकुराच्या माध्यमातुन जाणुन घेत असतो.अणि मग त्यांच्या सर्व समस्या अडीअडचणींचे मजकुराच्या माध्यमातुन निराकरण करीत असतो.

See also  क्रिमिनोलॉजी करिअर संधी – Criminology is a career Marathi

व्हाॅईस प्रोसेस मध्ये कस्टमरच्या समस्या अडीअडचणी तक्रारी आधी फोनवर ऐकुन घेतल्या जातात मग त्यावर समाधान केले जात असते.

यात आपणास कस्टमरशी संवाद साधताना खुप जास्त बोलावे लागते.हयामुळे व्हाॅईस प्रोसेस मध्ये आॅफिस मधील कर्मचारी वर्गाला नाॅन व्हाॅईस प्रोसेसच्या तुलनेत अधिक वेतन दिले जाते.

नाॅन व्हाॅईस मध्ये आपणास कस्टमरशी ईमेल चॅट,वेब चॅट पोर्टल चॅट वगैरे द्वारे मजकुराच्या माध्यमातुन संवाद साधायचा असतो.ज्यात कमी उर्जा मेहनत घ्यावी लागते म्हणून यात व्हाॅईस प्रोसेसच्या तुलनेत कर्मचारी वर्गाला कमी वेतन दिले जाते.

व्हाॅईस प्रोसेस मध्ये नाॅन व्हाॅईस प्रोसेसच्या तुलनेत कर्मचारी वर्गावर कामाचा अधिक प्रेशर असतो.ज्याचे परिणाम स्वरुप आॅफिसातील कर्मचारी वर्गाला विश्रांती देखील खुप कमी मिळत असते.पण यात आपणास नवनवीन गोष्टी शिकायची संधी प्राप्त होते.

नाॅन व्हाॅईस प्रोसेस मध्ये व्हाॅईस प्रोसेसच्या तुलनेत कर्मचारी वर्गावर कामाचा कमी प्रेशर असतो.ज्याचे परिणाम स्वरुप आॅफिसातील कर्मचारी वर्गाला विश्रांती देखील मिळत असते.पण यात आपणास नवनवीन गोष्टी शिकायची संधी प्राप्त होत नाही.

व्हाॅईस प्रोसेस मध्ये दोन पद्धतीने काम केले जाते पहिले आहे inbound अणि दुसरे आहे outbound.

1)इन्बाऊंड प्रोसेस सपोर्ट

2)आऊटबाऊंड प्रोसेस सपोर्ट

1)इन्बाऊंड प्रोसेस सपोर्ट-

इन्बाऊंड प्रोसेस सपोर्ट मध्ये कस्टमर कंपनीला एखाद्या समस्येचे अडीअडचणीचे निवारण करण्यासाठी काॅल करत असतो.

ही समस्या कुठल्याही टेक्निकल बाबतीत असु शकते जसे की साॅफ्टवेअर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस इत्यादी.

ज्यात साॅफ्टवेअर अॅप वगैरे इंस्टाॅल करताना येणारे ईरर,प्राॅब्लेम इत्यादींचा समावेश होतो.यात जी काही अडचण कस्टमरला येत असेल त्या विषयी योग्य ते मार्गदर्शन इन्बाऊंड सपोटरला करावे लागते.

इन्बाऊंड सपोटरच्या अंगी कोणकोणते गुण कला कौशल्य असणे आवश्यक आहे?

इन्बाऊंड सपोटरला आॅपरेटिंग सिस्टीमचे तसेच लॅन नेटवर्कचे नाॅलेज असायला हवे.

कस्टमरच्या समस्या अडीअडचणी समजून सोडविता आल्या पाहिजेत.त्याला कंप्युटर आॅपरेटिंग सिस्टम,अॅण्टी व्हायरस डेटा बेस इत्यादी संबंधित उत्तम नाॅलेज असायला हवे.

See also  आय आय बी एफ विषयी माहीती,कोर्सेस,परीक्षा पात्रतेच्या अटी- IIBF Information In Marathi

2)आऊटबाऊंड प्रोसेस सपोर्ट –

यात आऊटबाऊंड सपोटरला कस्टमरला कंपनीचे प्रोडक्ट सर्विस विकण्यासाठी स्वता काॅल करून ग्राहकांशी संवाद साधावा लागतो.त्यांना प्रोडक्ट घेण्यासाठी कन्वेन्स करावे लागते.

यासाठी आऊटबाऊंड सपोटरच्या अंगी वस्तु विकण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे.यात वस्तु विकल्यावर प्रत्येक प्रोडक्ट सर्विस मागे आऊटबाऊंड सपोटरला ठाराविक कमिशन प्राप्त होते.

याचसोबत आऊटबाऊंड सपोटर हे एनजीओ साठी डोनेशन गोळा करायला काॅल करणे,कंपनीचा सर्वे करण्यासाठी, कस्टमर व्हेरिफिकेशन करण्यासाठी,क्रेडिट कार्ड आॅफर देण्यासाठी देखील ग्राहकांना फोन लावत असतात.